पुणेकरांनो, आता शेतकरी राजा पुरवणार ताजी भाजी आणि फळं!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शेतकऱ्यांकडून भाज्या मागविण्यात येतील आणि शेती गटाच्या माध्यमातून विक्री होईल. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे : पुणेकरांनो तुम्हाला रोज ताजी भाजी मिळणार आहे. तिही तुमच्या घराजवळ, हवी तेव्हा, हवी तेवढी भाजी आणि फळही मिळतील. आणि हो, हिरवीगार भाजी तशी स्वस्तातही मिळेल! कारण, थेट शेतकरी ही भाजी आणणार आहेत. ती तुमच्यापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने शहरातील सगळ्या मंडई आणि आठवडे बाजारात पालेभाज्या उपलब्ध करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, शहराच्या विविध भागांतील ६५ आठवडे बाजार आणि ३२ मंडई या ठिकाणी रोज सकाळी आणि काही वेळा सायंकाळीही फळ आणि पालेभाज्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका आणि मार्केट याडातील आडते असोसिएशन, शेती गट यांच्यात चर्चा झाली असून, या उपक्रमाला पुढच्या दोन दिवसांत सरवात होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी सांगितले.

- गावात परतणाऱ्या सर्वांना होमक्वारंटाइन करणार : जिल्हापरिषदेचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, भाजी खरेदीसाठी मार्केट याडात प्रचंड गर्दी होत आहे. त्याशिवाय महात्मा फुले आणि अन्य मंडईतही तसेच चित्र आहे. पुढील २० दिवस 'लॉकडाऊन' असल्याने फळ, पालेभाज्या मिळणार का, याबाबत लोकांत संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या सोयीसाठी आठवडे बाजार आणि मंडईत भाजी उपलब्ध होणार आहे.

- Fight with Corona : 'त्या' दोन रुग्णांना मिळालेला डिस्चार्ज दिलासा देणारा : महापौर

गायकवाड म्हणाले, "शेतकऱ्यांकडून भाज्या मागविण्यात येतील आणि शेती गटाच्या माध्यमातून विक्री होईल. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ज्या प्रमाणात मागणी असेल, त्याप्रमाणात मालाची पुरवठा होईल. याची काळजी घेण्यात आली आहे.”

- गरीबांच्या घरातील चुली पेटत्या ठेवा - इम्तियाज जलील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will supply vegetables and fruits to pune citizens