esakal | पुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वर पहाटेपासून 5 अपघात; कंटेनरने पोलिसांच्या गाडीला उडविले
sakal

बोलून बातमी शोधा

5 accidents on Pune-Mumbai Expressway since morning and container blew up the police car

नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ झालेल्या अपघात एका कंटनेरने पोलिसांच्या वाहनाला उडविले असून यामध्ये 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कंटनेरने 5 वाहनांना उडविले असन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. 

पुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वर पहाटेपासून 5 अपघात; कंटेनरने पोलिसांच्या गाडीला उडविले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : पुणे-मुंबई महामार्गावर आज सोमवारी (ता.11) पहाटेपासून पाच वेगवेगळे अपघात झाले आहेत.  नर्हे येथे भूमकर पुलाजवळ वेगवेगळे 2, वाकड पुलावर 1, नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आणखी 2 अपघात झाले आहेत. दरम्यान पहाटे पासून झालेल्या 3 मृत्यू तर 19 जखमी झाले आहेत. 

नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ झालेल्या अपघात एका कंटनेरने पोलिसांच्या वाहनाला उडविले असून यामध्ये 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.तर दुसऱ्या कंटनेरने 5 वाहनांना उडविले असन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. 


पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

पहिला अपघात -  कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे....वाचा सविस्तर
 

दुसरा अपघात -  दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर देखील  उलटला. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. ....वाचा सविस्तर

वाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

तिसरा अपघात - कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लिनरचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे झाला....वाचा सविस्तर

चौथा अपघात - नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून -मुंबईकडे जाताना भरधाव कंटनेरने पोलिसांच्या गाडीला उडविले आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात  गाडीचा चुरडा झाला असून ग्रामीण पोलिसचे वरिष्ठ पोलिस आणि मदतनीस असे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

पाचवा अपघात - दरम्यान, त्याच ठिकाणी आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये एका रिक्षा आणि 2 कार चुरडा झाला असून रिक्षामधील सहा महिन्यांच्या बाळासह दोन महिला आणि चालक असे 4 जण जखमी झाले आहेत. साडे-नऊ वाजता झालेल्या अपघातामुळे परिसरात मोठी कोंडी झाली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top