esakal | आंबेगाव-शिरूरच्या ऑक्सिजन सुविधेसाठी आमदार निधीतून ५० लाख : वळसे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

dilip valse patil

आंबेगाव-शिरूरच्या ऑक्सिजन सुविधेसाठी आमदार निधीतून ५० लाख : वळसे पाटील

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढू. खासगी हॉस्पिटल चालकांनी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. ऑक्सिजन सुविधेसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले

मंचर (ता. आंबेगाव) येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वळसे पाटील मुंबईहून व पुण्यातून पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सहभागी झाले होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकरचे संचालक अॅड. प्रदीप वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कार्यकारी अभियंता बप्पा बहीर, आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य के. जे. कानडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. मोहन साळी, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: माजी मंत्री शिवतारेंचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा

आंबेगाव तालुक्यात गेली दोन दिवस रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झाला नाही. काही खाजगी हॉस्पिटलमध्ये वाढीव बिलाविषयी रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत आहेत. भाडे तत्वावर खाजगी हॉस्पिटलला व्हेटींलेटर भाड्याने द्यावेत, आदिवासी भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी डिंभे व शिनोली येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करावे, अशी मागणी शहा यांनी केली. बुधवार (ता. 21) एप्रिलपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न सुटेल. आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी प्रांत व गट विकास अधिकारी यांना अधिकार दिले आहेत,” असे प्रसाद यांनी सांगितले. शिल्लक ऑक्सिजन बेड, रुग्णाची प्रकृती, याबाबत माहिती देण्यासाठी व वाढीव बील तक्रार निवारणासाठी 24 तास आळीपाळीने दोन शिक्षकांच्या नेमणुका सरकारी व खासगी हॉस्पिटल मध्ये केल्या जातील, असे प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांनी सांगितले. गेटवेल हॉस्पिटलमध्ये कोविड उपचारासाठी मंगळवार (ता. 20) पासून 70 बेड उपलब्ध होणार असून त्यामध्ये ३५ ऑक्सिजन बेड आहेत. ५ ते 12 वयोगटातील मुलांसाठीही स्वतंत्र विभाग सुरु केला आहे, असे डॉ. भूषण साळी व डॉ. दिप्ती साळी यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात नमाजसाठी मशिदीत एकत्र येण्यावर निर्बंध

मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द येथे कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती पॉझिटीव्ह येत आहेत. घरात ही मास्क लावण्याची परिस्थिती उद्भवली आहे. स्वत:ची काळजी घ्या, जनजागृती करा, कार्यकर्त्यांनी पुढे येऊन रुग्णांना वा प्रशासनाला मदत करावी. विनाकारण लोक रस्त्यावर दिसता कामा नयेत . पोलिसांनी प्रभावी पणे काम करावे.-दिलीप वळसे पाटील गृहमंत्री