उजनी धरणात 50 टीएमसी पाणीसाठा; टेमघर 90 टक्के भरले

50 TMC water storage in Ujani Dam and Temghar is 90 percent full
50 TMC water storage in Ujani Dam and Temghar is 90 percent full
Updated on: 

पुणे : यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत आजअखेर 8.35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात सुमारे 50 टीएमसी (93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

- Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांपैकी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण भरलेली असून, टेमघर धरणातही सुमारे 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता 29.15 टीएमसी असून, सध्या 28.77 टीएमसी साठा झाला आहे. संपूर्ण प्रकल्प भरण्यासाठी केवळ 0.38 टीएमसी पाण्याची गरज आहे.

खडकवासला धरणातून काल रात्रीपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी मुठा नदीपात्रात 9 हजार 416 क्‍युसेक आणि कालव्यातून 1054 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. पानशेत धरणातून तीन हजार 908 क्‍युसेक आणि वरसगाव धरणातून चार हजार 441 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 

- विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

भाटघर, नीरा देवघर, वीर, मुळशी, कळमोडी, आंद्रा, आणि नाझरे ही धरणे पूर्ण भरली आहेत. तर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि विसापूर या धरणांत अद्याप 30 ते 45 टक्केच पाणीसाठा आहे.

पाणलोट क्षेत्रात संततधार : 
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शनिवारी दिवसभरात 30 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 26 मिमी, पानशेत 24 मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 7 मिमी पावसाची नोंद झाली.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी 
टेमघर 3.33   (89.78)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.97  (100)


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 6.57     (85.69)
पवना 8.04     (94.45)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
उजनी 49.48    (92.36)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Pune Student Protest: Abhijit Dipke Raises Questions Over Students’ Future
Marathi News Esakal
www.esakal.com