पुणे जिल्ह्यातील शनिवारी ५१३ नवे कोरोना रुग्ण; १ रुग्णाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील १ हजार ४२ जण शनिवारी (ता.१९) दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५३५ जण आहेत.
Corona Patient
Corona PatientSakal
Summary

पुणे जिल्ह्यातील १ हजार ४२ जण शनिवारी (ता.१९) दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५३५ जण आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) १ हजार ४२ जण शनिवारी (ता.१९) दिवसभरात कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील (Pune City) सर्वाधिक ५३५ जण आहेत. याउलट जिल्ह्यात दिवसात ५१३ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी पुणे शहर, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील २६५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १३०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८०, नगरपालिका हद्दीत १६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज कोरोना रुग्णांचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे.

Corona Patient
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यात ६४,२४३ ने झाली कमी

दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २२७, नगरपालिका हद्दीतील ४१ आणि कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी पाच हजारांच्या आत आली आहे. शनिवारी ही संख्या ४ हजार ७४३ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून ७१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ४ हजार ३० जण हे गृहविलगीकरणात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com