
पुणे जिल्ह्यातील 752 ग्रामपंचायतींपैकी 518 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
बारामती : आज जाहिर झालेल्या ग्रामपंचायत निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील 752 ग्रामपंचायतींपैकी 518 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
यात बारामती तालुक्यात 51 पैकी 50, इंदापूरमध्ये 60 पैकी 37, शिरुरमध्ये 62 पैकी 45, आंबेगाव मध्ये 29 पैकी 16, भोर 69 पैकी 35, वेल्हा 31 पैकी 16, खेड 90 पैकी 75, दौंड 51 पैकी 30, मावळ 57 पैकी 40, मुळशी 45 पैकी 37, जुन्नर 64 पैकी 40, खडकवासला 22 पैकी 17, पुरंदर 68 पैकी 35, हवेली 52 पैकी 45 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या विचारांचे ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीचेही उमेदवार काही ठिकाणी विजयी झाले आहेत. यात शिरुर, आंबेगाव, वेल्हा, खेड, मुळशी, जुन्नर, खडकवासला या तालुक्यांचा समावेश आहे.
Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच विकासाची गंगा पुढे नेऊ शकते, यावर मतदारांचा विश्वास आहे याची प्रचिती या निकालाने आली, अशी प्रतिक्रीया प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी राष्ट्रवादीच्या विचारांनी काम करणा-या उमेदवारांना विजयी केले आहे, याचाच अर्थ या जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकासाच्या विचारांवरचा हा विश्वास असल्याचे आपण मानतो, मतदारांनी जो विश्वास दाखविला आहे, तो पूर्ण करण्यासाठी पक्षीय स्तरावर व शासनस्तरावर काम केले जाईल असेही गारटकर म्हणाले.
Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी