पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील एवढे नागरिक मायदेशी परतले; वाचा सविस्तर

Vande-Matram-Mission
Vande-Matram-Mission

पुणे - परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत मिशन योजनेंतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक नागरिक परदेशातून आपल्या घरी परतले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आली. त्यामुळे परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाच्या मदतीने सहा मे पासून वंदे भारत मिशन योजना सुरू केली. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात १७ विविध देशांमधून १७० फ्लाइट्‌सचे नियोजन केले होते. 

वंदे भारत मिशनअंतर्गत चौथ्या टप्प्याची सुरुवात चार जुलैपासून झाली. पुणे विभागात २४ जुलैअखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून ४५७, दुसऱ्या टप्प्यामध्ये ७८९, तिसऱ्या टप्प्यात २ हजार २९७ तर चौथ्या टप्प्यामध्ये २ हजार १३१ अशा पाच हजार ६७४ नागरिक परदेशातून परतले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४ हजार ६५३, सातारा २८०, सांगली २२५, सोलापूर २७३ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २४३ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अमेरिका, ब्रिटनमधून सर्वाधिक फ्लाइट्‌स  
राज्यातील पुणे आणि मुंबई शहरात सर्वाधिक फ्लाइट्‌स अमेरिका आणि ब्रिटनमधून आल्या आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, कॅनडा, जर्मनी, बहरीन, केनिया, कुवेत, कतार, यूएईमधील दुबई, शारजाह, अबुधाबी तसेच साउथ आफ्रिका, स्वीडन, थायलंड, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, नेदरलॅंड आणि ओमान या देशातून नागरिक पुणे आणि मुंबईत परतले आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com