उरुळी कांचन, (पुणे ) : शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (ता.१८ ) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पूर्व हवेलीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तब्बल ६० जणांना जुगार घेळताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्यासह ,२ लाख ४६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा गुन्हे विभागाची निर्मिती मागील दोन वर्षांपासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरातील गारवा हॉटेल जवळ अतुल उर्फ आप्पा बाळासाहेब कांचन व योगेश उर्फ बाळा सोपान कांचन हे मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्यांच्या जुगाराचा क्लब चालवत आहेत.त्यानुसार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री ही कारवाई केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.