घरबसल्या मिळवा घरकामासाठी मावशी

कोरोना काळात कामवाल्या मावशींना जवळपास सर्वांनीच सुटी दिली. त्यामुळे त्यांचा रोजगार थांबला. तसेच या काळात घरकाम करणारी चांगली महिला मिळणे देखील मुश्‍कील झाले होते.
Mandar and Sunita
Mandar and SunitaSakal

पुणे - कोरोना (Corona) काळात कामवाल्या मावशींना जवळपास सर्वांनीच सुटी दिली. त्यामुळे त्यांचा रोजगार (Employment) थांबला. तसेच या काळात घरकाम (House Work) करणारी चांगली महिला मिळणे देखील मुश्‍कील झाले होते. त्यामुळे या दोघांची समस्या ‘इझी’ सोडविण्याचे काम पुण्यातील मेड इझी (maideasy) या ‘स्टार्टअप’ने केले आहे. (Maideasy Startup Available for House Work)

घरकाम करण्यासाठी चांगली कामवाली मावशी शोधणे कधी-कधी मोठी डोकेदुखी ठरते. आपल्या जवळच्यांना वारंवार आठवण करून देणे किंवा शेजारी असलेल्यांच्या मावशीला एखादी मावशी शोधायला सांगणे ही सध्या पारंपरिक पद्धत आहे. त्यात कोरोना काळात संबंधित मावशी योग्य काळजी घेतात का? कोरोनाविषयक साफसफाई त्यांना करता येते का? तसेच मावशींना कोरोना तर नाही ना? असे अनेक प्रश्‍ने त्यांना कामावर घेताना पडतात. या सर्वांची उत्तरे या स्टार्टअपने दिली आहेत. तसेच घर कामगार महिला या असंघटित. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना वैयक्तिक पातळीवरच प्रयत्न करावे लागतात. या स्टार्टअपने त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच ठिकाणी अनेक कामगार उपलब्ध असल्याने त्यांना रोजगार मिळणे सोपे झाले आहे. तर त्यांना कामावर घेणाऱ्यांनादेखील पर्याय मिळतात. १०० हून अधिक नागरिकांना या स्टार्टअपच्या माध्यमातून महिला घरकामगार मिळाल्या आहेत. तर आत्तापर्यंत २०० हून अधिक महिलांनी स्टार्टअपकडे नोंदणी केलेली आहे. २० वर्षांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात सल्लागार असलेले मंदार घुगरी आणि त्यांच्या पत्नी सुनीता घुगरी यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये हे स्टार्टअप सुरू केले.

Mandar and Sunita
पुणे नाशिक महामार्गावर अपघात: पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

स्टार्टअप नेमके काय करते?

  • घरकामगार महिलांना संघटित करते

  • घरकाम करण्यापासून कामाच्या ठिकाणी कसे वागावे, याचे प्रशिक्षण देते

  • कामावर रुजू होण्यापूर्वी संबंधित कामगाराची वैद्यकीय तपासणी केली जाते

  • गरज पडल्यास संबंधित महिलेची पोलिसांमार्फत तपासणी होते

  • काय व किती काम आहे, त्यानुसार कामगार पुरविला जातो

मागण्या सुटणार कधी?

  • पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरात दोन लाखांहून अधिक घरकामगार

  • नोंदणी असलेल्या कामगारांची संख्या नगण्य

  • कामगार म्हणून दर्जा मिळण्याचा संघर्ष सुरूच

  • या कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत

Mandar and Sunita
Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

कुटुंबातील सदस्य

घरकामगाराला मान व प्रतिष्ठा द्यायला हवी. घरचा एक सभासद म्हणून त्यांना जपायला हवे. त्यांच्याशी चांगला संवाद ठेवायला हवा. तसे केल्यास घरकामगार आणखी मन लावून व विश्वासाने काम करतील. फक्त पैसे देऊन त्यांची सेवा मनासारखी मिळवता येणार नाही, तर त्यांच्याशी चांगल्या भाषेत व चांगला व्यवहार करणे आवश्यक आहे, असे समुपदेशन आम्ही घरकामगार घेणाऱ्यांना करीत असल्याचे घुगरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com