नांदेड- खानापूर परिसराला कोरोनाचा विळखा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आणखी 14 तर खानापूर मध्ये काल पुन्हा 7 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने नांदेड ते खानापूर या परिसरातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे.

किरकटवाडी (पुणे) : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आणखी 14 तर खानापूर मध्ये काल पुन्हा 7 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने नांदेड ते खानापूर या परिसरातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. या पैकी 19 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नांदेड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील रुग्णसंख्या तीनच दिवसात 25 झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नांदेड सिटी येथे राहणाऱ्या व पुणे शहरात बँकेत नोकरी करणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर घरीच होम आयसोलेशनमध्ये खासगी रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत. नांदेड सिटी मधीलच आणखी एका 63 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी डोळ्यांच्या दवाखान्यात गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी ताप व खोकला जाणवू लागल्याने खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक काशिनाथ खुडे यांच्याकडून देण्यात आली.

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

नांदेड सिटी मधीलच एकाच घरातील चौघांसह अन्य एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड मधील घाडगे ईस्टेट मधील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेड सिटीसह नांदेड मधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे. किरकटवाडीतील अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या 'त्या' महिलेच्या कुटुंबातील तिचा 15 वर्षांचा मुलगा व 75 वर्षांचा सासरा यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवणे येथे स्लाइडिंग खिडक्या बनवण्याचे दुकान असणाऱ्या किरकटवाडीतील 40 वर्षीय व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर किरकटवाडी फाट्याजवळील एका रिक्षाचालकाच्या मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

खडकवासला येथील पॉझिटिव्ह आलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर महानगरपालिकेत चालक म्हणून नोकरी करणाऱ्या कोल्हेवाडी येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. खानापूर येथील 18 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील काही व्यक्तींचे अहवाल येणे बाकी होते त्यातील आणखी सात पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या 25 झाली आहे. नांदेड ते खानापूरपर्यंत झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. नागरिक व व्यावसायिक यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर प्रशासनाकडूनही कडक कारवाई झाल्याशिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालणे शक्य होणार नाही.

रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार झाले अन् उपचार सुरू करण्यापूर्वीच...

दरम्यान हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तब्बल अकरा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बंदोबस्त तैनात करताना व  पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज पार पाडताना पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सिंहगड व खडकवासला धरण पर्यटकांसाठी बंद असल्याने त्याठिकाणीही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 64 person affected by corona in nanded area