मोठी बातमी : राज्यातील 64 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग

64 police officers and staff has infected by Coronavirus in maharashtra
64 police officers and staff has infected by Coronavirus in maharashtra

पुणे : पोलिस. नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी रात्रंदिवस धडपडणारे पोलिस. अनेक पोलिस अधिकारी -  कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवतहेत. मात्र ज्यांचा जीव वाचवायचा आहे, त्या नागरिकांकडून पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. एक, दोन नव्हे तर आत्तापर्यंत राज्यातील तब्बल 64 पोलिसांना कोरोनाने गाठले आहे. तुमचा जीव वाचविणाऱ्या पोलिसांचा जीव आता धोक्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना आता तरी घराबाहेर पडू नका !

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला. तेव्हापासून आत्तापर्यंत नागरिकांना वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी जीवाचे रान करत आहेत. त्याचप्रमाणे पोलिस हा घटक रस्त्यावर खंबीरपणे उभे राहून नागरिकांना कोरोना पासून वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. कधी प्रेमाने, कधी समज देऊन, कधी जबरदस्तीने, तर कधी दोन - चार काठ्या मारून नागरिकांना फिरण्यापासून थांबवत आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, नागरिकांना वाचविताना अनेक पोलिस संध्याकाळी घरी गेल्यानंतर काळजावर दगड ठेवत आपल्या कुटुंबापासून "सेल्फ क्वारंटाइन" होत आहेत. त्यांनतर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून नागरिकांसाठी ते रस्त्यावर उतरून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. नेमके हे करत असतानाच पुण्यातील ३ पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाले. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीलाही कोरोनाने गाठले. हे एवढ्यावर थांबत नाही. राज्यातील 64  पोलिसाना कोरोना झाला आहे. त्यामध्ये 12 पोलिस अधिकारी आहेत. तर ५२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे या शहरांसह राज्यातील अन्य शहरांमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.
 

राज्याच्या आरोग्य विभागा बरोबरच पोलिस प्रशासन आपल्या  कोरोना बाधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे. परंतु नागरिक घराबाहेर पडले नाहीत, तर पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. एवढेच नाही, तर नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांना होणारा संसर्ग टाळता येऊ शकेल. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या पोलिसांच्या आरोग्याचे व त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होऊ शकणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"राज्य पोलिस दलातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांची काळजी घेतली जात आहे. अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवश्यक किट, फेस शिल्ड, सैनीटायझर, मास्क अशा सुविधा देत आहोत. तसेच आता त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याशी प्राधान्य देत आहोत." अनिल देशमुख, गृहमंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com