

चास (पुणे) : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून, 64 टक्क्यांवर (5.79 टिएमसी) पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 29 टक्क्यांनी वाढ झाली असून, तो वेगाने शतकाकडे झेपावत असल्याची माहिती धरणाचे सहायक अभियंता प्रेमचंद शिंदे व शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह भीमाशंकर खोऱ्यात म्हणजेच चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फायदा चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास होतो आहे. पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असलेले कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्या धरणातून होणारा विसर्ग चासकमान धरणात येत आहे. येणुरा नदीही दुधडी भरून वाहते आहे. या शिवाय सर्वच ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. हे सर्व पाणी चासकमान धरणात येत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 29 टक्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 64 टक्के (5.79 टिएमसी) पाणीसाठा असून, धरणात 12.16 द.ल.घ.मी. पाण्याची आवक होत आहे.
धरण व परिसरात एक जुनपासून 538 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 17 ऑगस्ट रोजी धरणात शंभर टक्के पाणीसाठा होता. तसेच, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही सुरू होता. चालू वर्षी मात्र धरण भरण्यास उशीर होत असून, चालू असलेल्या पावसाने धरण लवकरच शतक पार करेल, अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.