esakal | Alert: पुणे जिल्ह्यात ६७ कोरोना हॉटस्पॉट; ग्रामीण भागाने ओलांडला पाऊण लाखांचा टप्पा!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Hotspot

- आतापर्यंत घेतलेल्या कोरोना चाचण्या - ४ लाख २५ हजार ४४४
- एकूण कोरोनाबाधित - ७७ हजार १२३

Alert: पुणे जिल्ह्यात ६७ कोरोना हॉटस्पॉट; ग्रामीण भागाने ओलांडला पाऊण लाखांचा टप्पा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Coronavirus Updates: पुणे : पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी पाऊण लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात बुधवारअखेर (ता. १७) एकूण ७७ हजार १२३ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांपैकी ७२ हजार ९०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय १ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ५५८ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे ६७ हॉटस्पॉट आहेत. यापैकी ५५ हॉटस्पॉट हे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तर, उर्वरित बारा हॉटस्पॉट हे नगरपालिकांमध्ये आहेत.

हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या गावांमध्ये घोडेगाव, महाळुंगे पडवळ, अवसरी खुर्द, मंचर (सर्व ता. आंबेगाव), माळेगाव बुद्रूक, पणदरे, गुणवडी, मोरगाव (ता. बारामती), नसरापूर (ता. भोर), कुरकुंभ, यवत, लिंगाळी, केडगाव (ता. दौंड), देहू, किरकटवाडी, नांदेड, नऱ्हे, लोणी काळभोर, मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, उरुळीकांचन, वाघोली, केसनंद, कोलवडी, आव्हाळवाडी (ता. हवेली), भिगवण, निरगुडे (ता.इंदापूर), नारायणगाव, वारूळवाडी, ओतूर, उंब्रज, आळे, पिंपळगाव (ता. जुन्नर), कुरुळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, निघोजे (ता. खेड), कामशेत, वडगाव (ता. मावळ), बावधन, भूगाव, हिंजवडी, माण, म्हाळुंगे, मारुंजी, सूस (ता. मुळशी), गुळुंचे, पिंपरे खुर्द (ता. पुरंदर), सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, न्हावरे आणि पाबळ (ता. शिरूर) आदींचा समावेश आहे.

चिंताजनक : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनानं हात पसरले​

हॉटस्पॉट असलेल्या नगरपालिका...
बारामती, भोर, दौंड, इंदापूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, सासवड, जुन्नर, लोणावळा आणि शिरूर या नगरपालिकांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे.

ग्रामीण भागातील कोरोना सद्यःस्थिती (आकडेवारीत)
- आतापर्यंत घेतलेल्या कोरोना चाचण्या - ४ लाख २५ हजार ४४४
- एकूण कोरोनाबाधित - ७७ हजार १२३
- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ७२ हजार ९०२
- एकूण मृत्यू - १ हजार ६६३
- सध्याचे एकूण सक्रिय रुग्ण - २ हजार ५५८

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image