चिंताजनक : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनानं हात पसरले

corona
corona

Coronavirus Updates: पुणे : राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. राज्य सरकार आणि पुणे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना पुणे शहर, जिल्ह्यात आपले हात पसरू लागला आहे.  

बुधवारी (ता.१७) दिवसभरात पुणे शहरात दिवसभरात २५८७ रुग्णांना, तर जिल्ह्यातील ३५७४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २२३७९७ झाली आहे, अशी पुणे माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ४९८० वर पोचली आहे. ४२५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात ७६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण २०३७८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात १५०३२ एवढं अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तसेच दिवसभरात एकूण ११२३० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.  

दुसरीकडे, शेजारील पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १२४८ रुग्ण सापडले आहेत. आज पिंपरीतील रुग्णांनी हजाराचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८९६ झाली आहे. तसेच ६१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या पिंपरीत ७ हजार ९१२ सक्रिय रुग्ण आहेत. 

दरम्यान, पिंपरीतील तीन आणि पिंपरी बाहेरील २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ७६ हजार ८१३ जणांना लस देण्यात आली असून एक हजार ७४९ रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर सहा हजार १६३ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

पुणे विभागातील सद्यस्थिती :
पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या ६५९९७२ झाली आहे. पुणे विभागातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ९३.१९ टक्के आहे. पुणे विभागातील ६१५०५३ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असून सध्या २८३०६ अॅक्टिव्ह रुग्ण विभागात आहेत. आतापर्यंत पुणे विभागातील १६६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यानुसार आकडेवारी - बुधवारी (ता.१७)
पुणे - ३५७४
सातारा - १४१
सोलापूर - २५६
सांगली - ८७
कोल्हापूर - ४३

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com