पुणे : नव्या 80 रुग्णांची पडली भर; दिलासादायक गोष्ट म्हणजे...!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

गरजेनुसार लोकांना घरीच विलग राहण्याचा (होम क्वॉरंटाइन) आणि काही जणांना थेट रुग्णालयांत दाखल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

पुणे : शहरातील कोरोना रुग्णाच्या आकड्यात मोठी वाढ होऊन सोमवारी (ता.20) एका दिवसात 80 नवे रुग्ण सापडले असून, या रुग्णांची एकूण संख्या आता 666 इतकी झाली आहे. तर 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे, दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. 

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यात सतत वाढ होऊ लागली आहे. मात्र, रविवारी दिवसभरात एकाही मृत्यू झाला नाही आणि नव्या रुग्णांची संख्या थोडीशी कमी होऊन या दिवसभरात 42 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, सोमवारी रुग्णांचा आकडा जवळपास दुप्पटीने वाढल्याची नोंद झाली आहे. याआधी एका दिवसात सर्वाधिक 65 रुग्ण आढळून आले होते. 

- देशातील ५९ जिल्हे कोरोनामुक्त; नियमभंगाप्रकरणी केरळ सरकारची कानउघडणी!

शहरातील सुमारे 3 हजार 969 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची आतापर्यंत तपासणी झाली आहे. त्यापैकी 3 हजार 334 जणांचे अहवाल निगेटिव्ह झाले आहे. तर 666 लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर महापालिका आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक 185 जण डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. यापैकी विविध रुग्णालयांतील 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

- राज्यातील ६५ रुग्णांना पाठवले घरी; दिवसभरात आढळले तब्बल...!

संपूर्ण शहर 'सील' केल्यानंतर घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यात गरजेनुसार लोकांना घरीच विलग राहण्याचा (होम क्वॉरंटाइन) आणि काही जणांना थेट रुग्णालयांत दाखल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

- बिडीसाठी पळाला, पकडून आणल्यावर पोलिसांवर थुंकला आणि मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 new coronavirus patients found in Pune