832 drivers have been charged for violating traffic rules
832 drivers have been charged for violating traffic rules

वाहतूक नियमांचे उल्लंघन; एका महिन्यात तब्बल एवढ्या चालकांवर गुन्हे दाखल

Published on

पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवून अपघातास निमंत्रण देणाऱ्या 832 चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल केला.

शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावर रात्री, पहाटे किंवा भरदिवसा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघातात नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. जखमी झालेल्यांना आयुष्यभर दिव्यंगत्वाचे जीवन कंठावे लागते. त्यामुळे नियम मोडणाऱ्या चालकांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, वाहतूक शाखेच्या 24 विभागांमध्ये एक ते 30 डिसेंबर दरम्यान, विशेष मोहीम राबविली. यामध्ये 832 जणांविरुद्ध विविध ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे भंग करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, भरधाव वाहन चालविणे, अशा तीन हजार चालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.
 

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यामुळे गंभीर अपघात होऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. - डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

सहा महिन्यांपर्यंत कारावास
वाहन चालविताना बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे अपघात होतात. या अपराधासाठी सहा महिन्यांपर्यंतचा कारावास व एक हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com