esakal | पुणे : जिल्ह्यातील ९१ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : जिल्ह्यातील ९१ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील ९१ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. जिल्ह्यातील टॉप टेन हॉटस्पॉट गावांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत हॉटस्पॉट गावांच्या यादीत नऊ तालुक्यातील गावे आहेत. दरम्यान, खेड, मावळ, भोर आणि वेल्हे या चार तालुक्यातील एकही गाव हॉटस्पॉट गावांच्या यादीत नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: इंदापूर : नो पार्किंग झोनवर पोलीसांचा कारवाईचा बडगा

सध्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. घोडेगावपाठोपाठ याच तालुक्यातील मंचर येथे ५७ तर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ५४ सक्रिय कोरोना रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण हॉटस्पॉट गावांपैकी सर्वाधिक २५ गावे ही जुन्नर तालुक्यातील आहेत. जुन्नरपाठोपाठ बारामती तालुक्यातील १५, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी बारा आणि दौंड तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

टॉप टेन हॉटस्पॉट गावे व सक्रिय रुग्ण

- घोडेगाव, ता. आंबेगाव --- ६८

- मंचर, ता. आंबेगाव --- ५७

- नारायणगाव, ता. जुन्नर -- - ५४

- ओतूर, ता. जुन्नर --- ५२

- साकोरी, ता. जुन्नर --- ४७

- वारुळवाडी, ता. जुन्नर --- ४५

- वाघोली, ता. हवेली ---- ४३

- वरवंड, ता. दौंड ---- ३९

- पाटस, ता. दौंड ---- ३६

- पिंपळवंडी, ता. जुन्नर --- ३५.

तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या

- जुन्नर - २५, बारामती -१५, आंबेगाव व इंदापूर प्रत्येकी - १२, दौंड - १०, हवेली व शिरुर प्रत्येकी - ६, पुरंदर - ४आणि मुळशी - १.

(टीप :- खेड, मावळ, भोर, वेल्हे या चार तालुक्यातील एकही गाव हॉटस्पॉट गावांच्या यादीत नाही.)

रुग्णवाढीची प्रमुख कारणे

- स्थलांतर.

- निर्बंध न पाळणे

- लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधी आणि समारंभांना वाढती गर्दी

- मास्कचा वापर कमी होणे

- रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

- हॉटस्पॉट गावांमध्ये सर्वेक्षण

- या गावांमधील नमुना तपासणीवर अधिक भर

- कोरोना लसीकरणाची गती वाढवली

- निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई.

- विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई.

loading image
go to top