
पुणे म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी 70 हजार 633 नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. शेवटच्या दिवशी सोमवारपर्यंत तब्बल 97 हजार 344 अर्ज प्राप्त झाले आहेत.
पुणे - गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागातील पाच हजार 647 सदनिकांसाठी नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सोमवारपर्यंत तब्बल 97 हजार 344 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी 70 हजार 633 नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. उर्वरित अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी मंगळवार (ता. 12) शेवटचा दिवस असून, रात्री 12 वाजेपर्यंत ही रक्कम भरता येणार आहे.
पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात
"म्हाडा'च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी ही माहिती दिली. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. सदनिकांसाठी प्राप्त अर्जावरून मागणीचे प्रमाण उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत 20 पट इतके आहे. अनामत भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश नागरिक रक्कम जमा करतील. म्हाडाच्या मागील ऑनलाइन सोडतीसाठी 32 हजार अर्ज आले होते. या वेळी गतवर्षीच्या तुलनेत तिपटीने प्रतिसाद मिळाला, असे माने यांनी सांगितले.
एजंट खुनी हल्ल्याचा कट उघडकीस; कुविख्यात गुन्हेगाराला दिली होती १० लाखांची सुपारी
म्हाडाच्या सदनिकांसाठी 22 जानेवारीला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये सकाळी 10.10 वाजता ही सोडत काढणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
नागरिकांची घरांची मागणी वाढली आहे. सध्या कोरोनाचा काळ असूनही म्हाडाच्या सदनिकांसाठी नागरिकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांची म्हाडावरील विश्वासार्हता हे त्याचेच द्योतक आहे.
- नितीन माने, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे विभाग