
माने आणि नाणेकर हे चाळकवाडी येथे वसतिगृहात एकत्र होते. या ओळखीतून माने हा डिसेंबर महिन्यात कोऱ्हाळे याला घेऊन चाकण येथे नाणेकर याच्याकडे गेला होता.
नारायणगाव (पुणे) : येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर याचा खून करण्याची सुपारी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे (वय ६२,रा. नारायणगाव, ता.जुन्नर) याने कोणाला दिली होती? यावरून पडदा हटला आहे. नाणेकरवाडी येथील कुविख्यात गुन्हेगार गणेश रामचंद्र नाणेकर (वय २५, नाणेकरवाडी, चाकण, ता.खेड) याला यासाठी दहा लाख रुपये दिले होते आणि या कटात दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सात जणांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- 'मूर्ती लहान, कीर्ती महान' व्यक्तिमत्व; जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींबद्दलच्या १० गोष्टी
या प्रकरणी सोमवारी (ता.११) मुख्य आरोपी गणेश नाणेकर, अजय उर्फ सोन्या किरण राठोड (वय २३, चौदा नंबर, ता.जुन्नर), संदीप बाळशिराम पवार (वय २०,पिंपळवंडी, ता.जुन्नर) यांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोऱ्हाळे याला ८ जानेवारी २०२१ रोजी अटक केली असून प्रशांत माने (वय ३५, रा. नारायणगाव) हा फरार आहे.
कोऱ्हाळे हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. नाणेकर याच्यावर चाकण, खेड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नाणेकर याला अटक केल्याने घोडेकर यांच्यावरील खूनी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक गुंड म्हणाले, सोन्या राठोड हा नाणेकर टोळीचा सदस्य आहे. राठोड याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात अपहरण खून आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
- पुणे : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही युवकांचा मृत्यू
माने आणि नाणेकर हे चाळकवाडी येथे वसतिगृहात एकत्र होते. या ओळखीतून माने हा डिसेंबर महिन्यात कोऱ्हाळे याला घेऊन चाकण येथे नाणेकर याच्याकडे गेला होता. या वेळी एजंट घोडेकर याचा खून करण्याची सुपारी माने व कोऱ्हाळे यांनी नाणेकर याला दिली. नाणेकर याने घोडेकर याचा खून करण्याची कामगिरी राठोड याच्यावर सोपवली. राठोड याने संदिप पवार याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन घोडेकर याचा खून करण्याचे नियोजन केले. पवार याच्यावर घोडेकर याच्या हालचालीवर लक्ष ठेवून माहिती देण्याचे काम सोपवले.
- दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ
पवार याने दिलेल्या माहितीनुसार, सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता राठोड हा दोन अल्पवयीन मुलांसह दुचाकीवरून कोल्हेमळा येथे आला. या पैकी एका अल्पवयीन मुलाने घोडेकर याच्यावर कोयत्याने वार केले. तर राठोड आणि दुसरा अल्पवयीन मुलगा यांनी घोडेकर याला खाली पाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घोडेकर मृत होणार असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी अलिबाग येथे एक हॉटेल मध्ये मुक्कामी होते. रविवारी आरोपी नाणेकरवाडी येथे नाणेकर याच्याकडे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नारायणगाव पोलिसांनी नाणेकर, राठोड, पवार याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना रात्री ताब्यात घेतले.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आणि अतिशय संवेदनशील असलेल्या या खुनी हल्ला प्रकरणाचा तपास अतिशय तत्परतेने केल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक डी.के.गुंड यांचा सत्कार नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)