esakal | पुणे विभागातील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

results.jpg

पुणे विभागातील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विभागातून दहावीच्या दोन लाख ६५ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले असून, त्यातील ९९.९६ टक्के म्हणजे दोन लाख ६५ हजार ७०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागात पुणे जिल्ह्याच्या तुलनेत नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील निकाल अधिक असून, पुणे जिल्ह्यातील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १०० टक्के विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी पुणे विभागातून दोन लाख ६५ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ६५ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले. दहावीच्या परीक्षेसाठी १३ हजार ५८७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील १३ हजार ५२९ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी१२ हजार ४२८ विद्यार्थी (९१.८६ टक्के) उत्तीर्ण झाले असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष टी.एन. सुपे यांनी दिली.

हेही वाचा: IISER Pune Fire : संशोधकांच्या सजगतेमुळे टळला मोठा अनर्थ

जिल्हानिहाय आकडेवारी :

जिल्हा : नोंदणी केलेले : मूल्यमापन पात्र : उत्तीर्ण विद्यार्थी : निकालाची टक्केवारी

  • पुणे : १,३०,०२९ : १,३०,०२३ : १,२९,९६२ : ९९.९५ टक्के

  • नगर : ७०,५८९ : ७०,५८५ : ७०,५६६ : ९९.९७ टक्के

  • सोलापूर : ६५,१९६ : ६५,१९३ : ६५,१७६ : ९९.९७ टक्के

पुणे जिल्ह्यातील वैशिष्ट्ये :

  • पुणे शहरात २३ हजार ९८५ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले. त्यातील ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

  • पाच तालुक्यातील निकाल १०० टक्के : आंबेगाव, बारामती, इंदापूर, जुन्नर, वेल्हे

हेही वाचा: पीएमपी प्रवाशांना प्रवासाचे ‘मी कार्ड’ बदलावे लागणार

loading image