Amol Ramsing Kolhe : शिरूरचा गड राखण्यासाठी कसोटी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गतवेळी शिरूर लोकसभेचा गड खेचून आणला होता.
Amol Ramsing Kolhe
Amol Ramsing Kolhesakal

शिरूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गतवेळी शिरूर लोकसभेचा गड खेचून आणला होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या साम्राज्याला खिंडार पाडणाऱ्या डॉ. कोल्हे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वेळीही मैदानात उतरविले आहे. परंतु या वर्षी प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढा देताना त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही सामना करावा लागणार आहे.

शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाने डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीला यापूर्वीच ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला होता. प्रचार यंत्रणाही सुरू केली आहे. सिनेमा, नाटक आणि मालिकांच्या क्षेत्रातून पुढे आलेल्या डॉ. कोल्हे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय वाटचालीचा शिवधनुष्य उचलला होता.

Amol Ramsing Kolhe
Loksabha Election 2024 : बारामतीत ताई विरुद्ध वहिनी

प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि फर्डे वक्तृत्व, राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून जनमानसात निर्माण झालेला आदर आणि त्यातून घराघरांत निर्माण झालेली लोकप्रियता या गुणांच्या आधारे त्यांचा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. प्रचारक, उपनेते आणि पुणे संपर्क प्रमुख या संघटनात्मक बांधणीच्या पदांवर काम करताना त्यांनी थेट निवडणुकांच्या फंदात न पडता कधीही लाभाचे पद घेतले नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच बारामतीमध्ये त्यांच्या ‘शिवपूत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू होते. त्यात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि तिथूनच त्यांच्या शिरूर मतदारसंघातील उमेदवारीची चक्रे वेगाने फिरली. पवार यांनी त्यांना थेट शिरूरच्या रणात उतरविले आणि मोहीम फत्तेही केली.

त्यांनी आढळराव यांचा पराभव केला. आताच्या निवडणुकीत मतदारसंघातील संपर्काचा अभाव, प्रलंबित विकासकामे, गतवेळच्या पराभवामुळे आढळराव यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती, मालिकेचा ओसरलेला प्रभाव आणि अजित पवारांनी दिलेले उघड चॅलेंज या आव्हानांचा तर त्यांना सामना करावा लागणारच आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा राजकीय प्रवास

  • सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय

  • २०१४ - शिवसेनेत प्रवेश

  • उपनेते, मुख्य प्रचारक आणि पुणे संपर्क प्रमुख म्हणून योगदान

  • २०१९ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंगेसमध्ये प्रवेश.

  • पहिल्याच वेळी खासदार म्हणून दणदणीत विजय

  • लोकसभेतील उपस्थिती व उल्लेखनीय कामगिरीतून तीन वेळा ‘संसदरत्न’चा सन्मान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com