Pune Crime : पुणं हादरलं! अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime : पुणं हादरलं! अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी...

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिलांच्या अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुण्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीवर 19 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी भागात घटना घडली आहे.

पुण्यातील वानवडी येथे एकाच परिसरात राहणाऱ्या आणि ओळखीच्या असणाऱ्या एका तरुणाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेसंबधी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार मागील वर्षीच्या जानेवारी ते जून दरम्यान घडला असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी हे एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांना ओळखतात. ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला घरी खेळण्यासाठी बोलवले आणि त्यानंतर "माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करू" असे सांगितले. अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचा फायदा घेऊन या आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले.

हेही वाचा: NCP Pune : राष्ट्रवादीने दाखल केलेल्या पुणे प्रभाग रचनेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

काही दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत ती 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Maharashtra Politics : राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले; ठाकरे गटाला भलताच संशय

टॅग्स :Pune Newspolicecrime