Daund news : बंधाऱ्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

दहिटणे (ता. दौंड) येथील योगेश काळूराम कोळपे (वय ३८) हा शुक्रवारी (ता. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खामगावच्या दिशेने गेला होता. दहिटणे येथे परत येताना धोकादायक बंधाऱ्यावरून तोल जाऊन योगेश नदीपात्रात पडला.
Daund news
Daund news sakal

राहू : दहिटणे (ता. दौंड) येथील योगेश काळूराम कोळपे (वय ३८) हा शुक्रवारी (ता. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खामगावच्या दिशेने गेला होता. दहिटणे येथे परत येताना धोकादायक बंधाऱ्यावरून तोल जाऊन योगेश नदीपात्रात पडला.

तासाच्या प्रतीक्षेनंतर गावातील नागरिक, नातेवाइकांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली व एक तासानंतर तो सापडला. त्याला त्वरित यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले.

Daund news
Pune News : मिळकतकर थकबाकी आकारणीबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, कारवाई करू नका - अजित पवार

याप्रकरणी योगेशचे वडील काळूराम तुकाराम कोळपे यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली. योगेश याच्या मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com