'हाच' का तो कोरोनावरचा जालिम काढा?

ka.jpg
ka.jpg

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी असे वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी पुण्यातील झेड.व्ही.एम. युनानी कॉलेजने 'आयुष काढा' हा युनानी हर्बल काढा घरी करता येईल अशा पॅकेटमध्ये तयार करून पुणेकरांना उपलब्ध करून दिला आहे. या हर्बल काढ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत मिळू शकते अशी माहिती युनानी फार्मसी विभाग प्रमुख डॉ. मुसरत नफिस यांनी दिली.

हा काढा पॅकेट स्वरूपात देण्यात येत आहे. तर पाकिटातील मिश्रण एक ग्लास पाण्यात उकळवून ते अर्धे झाले की ते प्यायचे आहे. तसेच सात दिवस रोज दोन वेळा या काढ्याचे सेवन करावे. अशी माहिती युनानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जलीस अहमद यांनी दिली.

महाराष्ट्र मेडीकल रिसर्च सेंटर संचालित हे युनानी महाविद्यालय पुण्यातील एकमेव युनानी महाविद्यालय आहे. शेकडो वर्ष युनानी ग्रंथांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, श्वसन विकार, घशाचे विकार, विषाणू विकार नियंत्रित करण्यासाठी या काढ्याची महती देण्यात आली आहे. काढा पूर्वीपासून वापरण्यात येत असून आयुष मंत्रालयाद्वारे मान्यता प्राप्त आहे. तसेच आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करूनच याला बनविण्यात येत आहे.

यासाठी लागणारे सर्व प्रकारची हर्बल रोप किंवा झाडे हे महाविद्यालयात असल्याने त्याचा वापर केला जातो. यामुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी मदत मिळते. अशी माहिती महाराष्ट्र मेडीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com