अभाविप इंदापूर शाखेकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्याया विरुद्ध निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभाविप इंदापूर शाखेकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्याया विरुद्ध निदर्शने

अभाविप इंदापूर शाखेकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्याया विरुद्ध निदर्शने

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर (पुणे) : गेले चार दिवसांपासून एस. टी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरण करावे तसेच इतर राज्यातील कर्मचाऱ्यांएवढा पगार द्यावा म्हणून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्या तील सर्वसामान्य प्रवाश्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी बंद आहे .त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना, जेष्ठ रुग्णांना त्याचा तीव्र फटका बसला आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्या साठी अभाविप इंदापूर शाखेकडून दि.११ नोव्हेंबर रोजी इंदापूर प्रशासकीय भवन प्रवेश द्वारासमोर तसेच शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला.अभाविप इंदापूर तालुका प्रमुख भरत आसबे, शहर मंत्री अवधूत बाचल, सहमंत्री ओंकार हिंगमिरे, आंदोलन प्रमुख सुरज खामगळ, स्वप्नील भंडलकर, श्रीकांत चिंगळे ,शेखर गुजर, प्रतीक रेडके आदींनी या आंदोलनात भाग घेतला. यावेळी इंदापूर तहसिल कार्यालयास निवेदन देण्यात आले.

भरत आसबे म्हणाले, अनेक वर्षापासून एस टी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार मध्ये सामावून घ्यावे व इतर विविध मागण्यासंदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहे, त्यासाठी आंदोलन देखील झाली आहेत व सुरू आहेत. शासनाने योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन देखील मात्र अजूनही तोडगा निघत नाही. दि. ११ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

ग्रामीण भागात विद्यार्थी बसचा पास काढून प्रवास करतात. मात्र बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतआहे.त्यामुळे यावर कायमस्वरूपी लवकरात लवकर तोडगा काढून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनीदिला.

loading image
go to top