सव्वा लाख विद्यार्थ्यांनी दिली 'मॉक टेस्ट'; टेक्निकल प्रॉब्लेमशी विद्यार्थ्यांचा सामना

Students_Exam
Students_Exam

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सरावासाठी गुरुवारी (ता.८) मॉक टेस्ट घेण्यात आली. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास एक लाख २१ हजार १०७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परंतु लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे, सर्व्हर डाऊन होणे अशा अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना यावेळी करावा लागला.

पुणे विद्यापीठातर्फे येत्या १२ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाची परीक्षा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेचा सराव करता यावा, यासाठी गुरुवारी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान मॉक टेस्ट घेण्यात आली. विद्यापीठातर्फे एजन्सीमार्फत सर्व विद्यार्थ्यांना सराव परीक्षेबाबत लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात आले होते. मात्र, त्यातील काही विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाले नाहीत. एकाच वेळी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे विद्यापीठाचे संकेतस्थळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी क्रॅश झाले होते, असे परीक्षा विभागातील विश्वनीय सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठातर्फे शुक्रवारी (ता.९) आणि शनिवारी (ता.१०) या दिवशी सकाळी दहा ते सहा यावेळेत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मॉक टेस्ट देता येणार आहे. 
एका विद्यार्थ्याला दिवसभरात किमान पाच वेळा मॉक टेस्ट देता येईल,असे परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच गुरुवारी विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी शुक्रवारी आणि शनिवारी येऊ नयेत, याबाबतची खबरदारी विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे.

"मॉक टेस्ट सुरू होण्यापूर्वी ई-मेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात आला होता. टेस्टच्या वेळेत तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकण्यात आला. मात्र, लॉग-इन झालेच नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. परंतु आज परीक्षा देता आली नाही. हाच प्रकार सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेत झाल्यास आमची परीक्षा देण्याची संधी जाईल." 
- एक विद्यार्थी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com