आतापर्यंत २५०० प्रवाशांना करण्यात आलंय 'क्वारंटाईन'; पुण्याचे सर्वाधिक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

केवळ 22 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आली आहे. आणखी 26 जणांच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. उर्वरित 491 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : कोरोना विषाणू संसर्गग्रस्त देशांमधून परत आलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2,605 प्रवाशांना घर आणि हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहरातील 1525 पिंपरी चिंचवडमधील 613 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 467 प्रवाशांचा समावेश आहे. ही शनिवारी (ता.21) सकाळी अकरा वाजेपर्यंतची स्थिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापैकी 789 प्रवाशांनी निरीक्षणाखालील 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील 762 आणि ग्रामीण भागातील 27 जणांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत एक हजार 816 प्रवासी अद्यापही विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 792, पिंपरी चिंचवडमधील 584 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 440 जणांचा समावेश आहे.

- Coronavirus : राज्यातील चाचणीचे निकष बदलले; दिवसभरात रुग्णांची संख्या पोहोचली...

दरम्यान, आज सकाळी (ता.21) 11 वाजेपर्यंत शहर व जिल्ह्यातील मिळून एकूण 539 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 490 उपाहारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 49 संशयित रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या सर्वच्या सर्व 539 संशयित रुग्णांची कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी करण्यात आली आहे.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

त्यापैकी केवळ 22 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आली आहे. आणखी 26 जणांच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. उर्वरित 491 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आजअखेर 117 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आयडीएसपी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता.21) सांगितले.

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

कोरोना संसर्ग संक्षिप्त माहिती

- आजअखेर रुग्णालयात दाखल केलेले एकूण संशयित रुग्ण - 539
- कोरोना तपासणीसाठी नमुने पाठवलेल्या रुग्णांची संख्या - 539
- नमुना तपासणी अहवाल प्राप्त संख्या - 513
- संसर्ग झाला नसल्याचे आढळून आलेले रुग्ण - 491
- कोरोना बाधित रुग्णांची संख्या - 22
- तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी - 26
- उपचारानंतर घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या - 490
- 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले रुग्ण - 117

- कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..

कोरोना संशयित प्रवासी विलगीकरण स्थिती

- आजअखेर विलगीकरण केलेले एकूण संशयित प्रवासी (घर व रुग्णालय मिळून) - 2605
- 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेले प्रवासी - 789
- सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या - 1816
- पुणे शहरातील विलगीकरण प्रवाशांची संख्या - 792
- पिंपरी चिंचवडमधील विलगीकरण प्रवासी - 584
- ग्रामीण भागातील विलगीकरण प्रवाशांची संख्या - 440

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: above 2500 passengers have been made quarantine in Maharashtra