पुण्यात भाजीपाला मुबलक पण...

market yard.jpg
market yard.jpg

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केटयार्डात फळभांज्याची आवक हळूहळू वाढत आहे. नियमित आवकेपेक्षा सध्या कोरोनामुळे ५० -६० टक्के भाजीपाला आणि फळांची अवाक होत आहे. परंतु, शहरातील हॉटेल, मेस, खाणावळी, आयटी कंपनी बंद असल्याने शेतमालाला उठाव कमी आहे. तसेच शहरातील अनेक ठिकाणच्या भाजीमंडई सुरु नसल्यामुळे भाज्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे सध्या भाजीपाला मुबलक परंतु ग्राहक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रविवारच्या तुलनेत सध्या भाजीपाल्याचे भाव स्थिर आहेत. घरगुती ग्राहक वगळता इतर ग्राहक फक्त १० टक्के आहे. सध्या शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. विविध जिल्ह्यातील शेतकरी शहरात भाजीपाला विक्रीसाठी आणत आहेत. शहरातील विविध भागात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला शेतकरी त्यांच्या विक्रीच्या ठिकाणी पोहच करत आहेत. तसेच मार्केट यार्डात ही मुबलक भाजीपाल्याची आवक होत आहे. तसेच भुसार बाजार सुरू असल्याने किराणा मालाच्या तुटवडा नाही.

शुक्रवारी शहरात भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला किरकोळ दुकानात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उपलब्ध होत असल्याची माहिती मार्केट यार्डतील व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. शिवाजीनगर, कोथरुड, वारजे-माळवाडी, कर्वेनगर, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन, गोकुळ नगर, सुखसागर नगर, परिसरात भाजीपाला उपलब्ध होता.

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव

राज्यातील 'या' ठिकाणावरून येतो शेतीमाल
बाजारात पुणे जिल्हा, सातारा, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागातून शेतमालाची आवक होत आहे.

किरकोळ बाजारात सध्या ग्राहक खूपच कमी असल्याने भाजीपाल्याला मागणी कमी आहे. अनेक लोक सध्या बाहेर पडणे टाळत आहेत. सध्या मुबलक भाजीपाला उपलब्ध आहे. तसेच भाव स्थिर आहेत. 
- प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते.
 

परराज्यातून आलेला शेतमाल

  • आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात : हिरवी मिरची : ८ टेम्पो
  • कर्नाटक, गुजरात : कोबी : ३ ट्रक 
  • कर्नाटक : घेवडा : ४ टेम्पो
  • इंदौर : गाजर : ५ टेम्पो
  • हिमाचल प्रदेश : मटार : ५ टेम्पो
  • बेंगलोर :  टोमॅटो : १ टेम्पो
  •  कर्नाटक : तोतापूरी कैरी : २ टेम्पो
  • आग्रा, इंदौर : बटाटा : २० ट्रक
  •  मध्यप्रदेश, गुजरात :  लसूण :  ६ ट्रक



किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
भाज्या              दर
हिरवी मिरची-      80
शेवगा -              80
गवार-                 60
वांगी -                  60
दोडका -              80
कांदा  -                20
बटाटा   -              40
लसूण  -              160


पालेभाज्यांचे गड्डीचे दर
कोथिंबीर             15
मुळा                   40
मेथी                    25
कांदापात              30

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com