पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुरूवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सापळा रचला.

पुणे : न्यायालयात लवकर दोषारोपपत्र पाठविल्याच्या बदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) ताब्यात घेतले. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

श्रद्धा शरद अकोलकर (वय 35) असे 'एसीबी'ने ताब्यात घेतलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने 'एसीबी'कडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधीत गुन्ह्यासंबंधीचे दोषारोपपत्र न्यायालयात लवकर सादर करण्याची मागणी तक्रारदाराकडून केली जात होती. दरम्यान, अकोलकर यांनी दोषारोपपत्र लवकर सादर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीनुसार, तक्रारदार यांनी अकोलकर यांना पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!​

तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुरूवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सापळा रचला. तेव्हा अकोलकर यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, पोलिस कर्मचारी वैभव गोसावी आणि गणेश भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB arrested female police constable for accepting a bribe of Rs 5000