The ACB caught the District Special Auditor  accepting a bribe of Rs 50000
The ACB caught the District Special Auditor accepting a bribe of Rs 50000

पुणे : विशेष लेखा परिक्षक लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

पुणे : सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पावणे चार लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी 3 लाख स्विकारले होते. तर उर्वरित 75 हजारापैकी 50 हजार रुपये स्विकारणाऱ्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील लेखा परीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (एसीबी) पथकाने शनिवारी मध्यरात्री अटक केली.

फेसबुक फ्रेंडशीप पडतेय महागात; अशी होतेय महिलांची फसवणूक      

भगवंत नारायण बिडगर ( वय ५६) असे अटक केलेल्या लेखापरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 53 वर्षीय व्यक्तिने फिर्याद दिली आहे. 'एसीबी"ने दिलेल्या माहितीनुसार, 
तक्रारदार हे प्रमाणित खासगी लेखा परीक्षक असून संस्थेच्या नेमणुकी नुसार त्यांनी एका सहकारी पतसंस्थेचे ऑडीट केलेले होते. बिडगर याने त्यांच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये तक्रादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. ही कारवाई न करण्यासाठी बिडगरने त्यांच्याकडे पावणे चार लाख रुपये मागितले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी यापूर्वी 3 लाख रुपये दिले होते. त्यानंतरही बिडगरकडून उर्वरित 75 हजार रूपयांची मागणी केली जात होती.

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

लाच देणे तक्रारदार यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी 'एसीबी'कडे तक्रार केली होती. दरम्यान, 75 हजार रूपयांपैकी 50 हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री हडपसर परिसरात पैसे स्वीकारत असताना 'एसीबी'च्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम हडपसर पोलिस ठाण्यात रविवारी पहाटेपर्यंत सुरु होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. 

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com