माळेगाव कारखान्याचे माजी संचालक स्वरूप वाघमोडेंचे अपघाती निधन

कल्याण पाचांगणे
Sunday, 22 November 2020

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वरूप हरिभाऊ वाघमोडे (वय 49) यांचे अपघाती निधन झाले.

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वरूप हरिभाऊ वाघमोडे (वय 49) यांचे अपघाती निधन झाले. आज दुपारी दोनच्या दरम्यान वरील घटना घडली. माळेगाव परिसरामध्ये शोक व्यक्त होत आहे.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

त्यांच्या पश्चात आई पत्नी, दोन मुली, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. विशेषत: माळेगाव परिसरामध्ये ब्रह्मचैतन्य पतसंस्थेची स्थापना करून त्यांनी सामान्य लोकांना अर्थपुरवठा करीत त्यांचे प्रपंच सावरण्याचा प्रयत्न केला होता.

वाघमोडे हेभारतीय जनता पार्टीच्या विचाराचे होते. ते माळेगाव कारखान्याचे  माजी अध्यक्ष  व संचालक  रंजन  तावरे  यांचे खंदे समर्थक म्हणून  ओळखले जात होते. असे  असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांचा मित्र परिवार मोठा होता. माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

दरम्यान, वाघमोडे यांनी माळेगाव परिसरामध्ये एकरी शंभर टनांपर्यंत ऊस उत्पादनाबरोबर आल शेती चांगली विकसित केली. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आल्याची शेती कशी करायची यासंदर्भात शिवारात जाऊन मार्गदर्शन केले. खर्चाच्या तुलनेत अधिक दोन पैसे मिळवून देण्यालसाठी प्रयत्न केले होते. साहजिकच त्यांनी शेती आणि शेती पूरक व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात चांगला ठसा उमटवलाचे दिसून आले होते. शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of Swaroop Waghmode