
सुपे (ता.बारामती) येथील एका मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल व रोख रकमेसह सुमारे साडेनऊ लाखांची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह पंचवीशीच्या आतील पाच आरोपींना ४८ तासांच्या आत जेरबंद केल्याने सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकारी पोलीसांचे कौतुक होत आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त ही कामगिरी केली.
सुपे - सुपे (ता.बारामती) येथील एका मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल व रोख रकमेसह सुमारे साडेनऊ लाखांची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह पंचवीशीच्या आतील पाच आरोपींना ४८ तासांच्या आत जेरबंद केल्याने सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकारी पोलीसांचे कौतुक होत आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त ही कामगिरी केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शुक्रवारी (ता.४) मध्यरात्रीच्या सुमारास सुप्यातील नवजीवन इलेक्ट्रीक अँन्ड इलेक्ट्रिकल मोबाईल शॉपीचे शटर उचकटून व काचा फोडून मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज, पेन ड्राईव्ह, एलसीडी टिव्ही, चांदीचे शिक्के, घड्याळ व रोख रक्कमेसह ९ लाख, २६ हजार १६८ रूपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला होता. याबाबत मयूर रामदास लोणकर (वय २१, राहणार सुपे, गदादेवस्ती, ता.बारामती) यांनी फिर्याद दिली होती.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती
त्यावर सी.सी.टीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधिकारी लांडे यांनी दिली. ते म्हणाले- या घटनेत अतुल पोपट येडे (वय २५, राहणार लिंगाळी, ता.दौड) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता गुन्हा उघडकीस येऊन त्याच्या अन्य साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. मिथुन प्रकाश राठोड (वय १९), संदीप बाबुराव राठोड (वय २४) आकाश मच्छिंद्र गुंजाळ (वय २२), आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व राहणार राघोबानगर, गिरीम, ता.दौंड) यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा ‘यंग बझ’तर्फे
पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरिक्षक योगेश शेलार, गणेश कवितके, शिवाजी ननवरे, सहायक फौजदार पोपट जाधव, काँन्स्टेबल सलमान खान, विशाल नगरे, हिरालाल खोमणे, अक्षय सिताप, किसन ताडगे, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ, आबा जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार उमाकांत कुंजीर, अनिल काळे, रविराज कोकरे, राजु मोमीन, विजय कांचन, अभिजीत एकसिंगे, धिरज जाधव या पथकाने ही कामगीरी केली. सदर गुन्ह्याचा तपास फौजदार योगेश शेलार करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग तरुणाईला सर्वाधिक
पोलीस अधिकारी सोमनाथ लांडे यांचे कौतुक
गेल्या आठवड्यात सुपे परिसरात प्रेम प्रकरणास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून झालेल्या खुनाचा तपास लागलीच लावून आरोपींना जेरबंद केले. मोरगाव येथील सराफाला लुटल्याप्रकरणी त्याही चोरट्यांना ताब्यात घेतले. आणि सुप्यातील चोरी प्रकरणी दोन दिवसात मुद्देमालासह चोरट्यांना जेरबंद केल्याबद्दल श्री.लांडे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Edited By - Prashant Patil