सावत्र मुलीवर बलात्कार करणारा आरोपी निघाला गुन्हेगार

चिंतामणी क्षीरसागर
Wednesday, 14 October 2020

नऊ वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार करणारा तो नराधम चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

वडगाव निंबाळकर : नऊ वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार करणारा तो नराधम चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बोकनगाव (ता. जि. लातूर) येथील रहिवासी असून त्याच्यावर लातूर येथील एटीएम सेंटर फोडल्याचा गुन्हा दाखल आहे.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

गेल्या सहा वर्षांपासून फरारी आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव जवळच्या शेरेवाडी येथे एका पोल्ट्रीवर तो कामाला होता. दरम्यानच्या काळात एका विधवा महिलेशी लग्न झाले. तिला दोन अपत्य थोरली मुलगी नऊ वर्षाचे आहे तिच्यावर घरात कोणी नसताना बलात्कार केला होता. पीडित मुलीने आजोळी जाऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला.

पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यावर तात्काळ सापळा लावून आरोपी रंगनाथ याला पोलिसांनी गजाआड करत बाल लैंगीक अत्याचार, बलात्कार ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे गुरूवार (ता. ८ रोजी) दाखल केले होते. न्यायालयाने ६ दिवसांची बुधवार (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी दिली. बलात्कार करणारा नराधम गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

आरोपीला यापुढे न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे फौजदार सुभाष मुंढे पोलिस हवालदार संजय मोहीते यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused in the Bokangaon case are criminals