esakal | कुख्यात गुंडाचा खून करुन दहा वर्षांपासून होता फरारी; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली अटक!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Crime

नगर पोलिसांनी या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक केली आहे. तर सर्फराज हा मागील दहा वर्षापासून फरार होता.

कुख्यात गुंडाचा खून करुन दहा वर्षांपासून होता फरारी; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली अटक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नगरमध्ये कुख्यात गुंडाचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कोंढवा येथे बेड्या ठोकल्या. संशयित आरोपी मागील दहा वर्षापासून नगर पोलिसांना गुंगारा देत पुण्यात वास्तव्य करीत होता.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या दर्शनाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पोलिसांना दिले आदेश

सर्फराज रज्जाक मणियार (वय ३६, रा. कोंढवा खुर्द, मूळ रा. माळीवाडा, नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे  या प्रकरणी नगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर शहरातील माळीवाडा भागात २४ ऑगस्ट २०१० या दिवशी अमित उर्फ बाबू वाघमारे (वय ३०, रा.अण्णाभाउ साठे वसाहत, माळीवाडा, नगर) कुख्यात गुंडाचे टोळक्याने पूर्ववैमनस्यातून अपहरण करून हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. नगर पोलिसांनी या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक केली आहे. तर सर्फराज हा मागील दहा वर्षापासून फरार होता.

Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी​

दरम्यान, नगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कोंढवा परिसरातील कौसरबाग भागातील हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी विजयसिंग वसावे, संजय बरकडे यांच्या पथकाने सर्फराज मणियार यास सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली, त्यावेळी त्याने खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. त्यास पुढील कारवाईसाठी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top