esakal | बारामतीकरांनो जरा जपून, विनामास्क फिरणाऱ्यांना `असा` बसतोय दणका 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati police.jpg


बारामतीत बेशिस्त नागरिकांकडून पावणेदोन लाखांचा दंड वसूल 

बारामतीकरांनो जरा जपून, विनामास्क फिरणाऱ्यांना `असा` बसतोय दणका 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनाची स्थिती बिघडू नये, यासाठी आता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात आज व काल मिळून मास्कविना फिरणाऱ्यांवर व बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली असून, पावणे दोनलाखांचा दंड बेशिस्त नागरिकांकडून वसूल केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आज व काल सलग दोन दिवस मास्कविना फिरणाऱ्या ८९२ जणांवर कारवाई केली. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याबद्दल २४ जणांवर; तर वाहतुकीस अडथळा करण्यासाठीही दोन दिवसात २७२ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पावणेदोन लाखांचा दंड बेशिस्त नागरिकांकडून वसूल केला. तसेच, विनामास्क फिरणाऱ्या १९८ नागरिकांवर कारवाई केली. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक औंदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे व अश्विनी शेंडगे, फौजदार योगेश शेलार, पोपट नाळे, अनिल सातपुते, दादासाहेब डोईफोडे, गोदेश्वर पवार, पोपट कोकाटे, किशोर वीर, तात्या खाडे, विजय जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोरोना गायब झाला असून, सगळे आबादीआबाद आहे, अशा थाटात अनेक जण विनामास्क फिरून स्वतःला व इतरांनाही धोका निर्माण करू पाहत असल्याचे या कारवाईदरम्यान समोर आल्याची माहिती औदुंबर पाटील यांनी दिली. 

बारामती तालुका दुसऱ्या क्रमांकावर 
बारामती तालुका पोलिसांनीही पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली बेशिस्त नागरिकांवर गेल्या काही दिवसात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात विनामास्कच्या केसेसच्या प्रमाणाबाबत बारामती दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.