इंदापुरातील वाळू माफियांना दणका, दोन टोळ्या तडीपार

राजकुमार थोरात
Saturday, 6 June 2020

इंदापूर तालुक्यामध्ये वाळूच्या माध्यमातून दशहत निर्माण करणाऱ्या  दोन टोळ्यांतील १२  वाळू माफियांना  जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यांतून तडीपार केले.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यामध्ये वाळूच्या माध्यमातून दशहत निर्माण करणाऱ्या  दोन टोळ्यांतील १२  वाळू माफियांना  जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यांतून तडीपार केले.

दौंड तालुक्यातील गिरीम येथे 21 लाखांचा गांजा जप्त

याबाबत वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी माहिती दिली की, इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बबलू पवार (रा. रणगाव) व महेश अर्जुन (रा. चिखली) यांच्या टोळीला तडीपार केले आहे. बबलू पवार याच्या टोळीने वालचंदनगर व इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गर्दी करून मारामारी, दरोडा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार केला होता. तसेच, महेश अर्जुन याच्या टोळीने टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी व आर्थिक प्राप्तीसाठी वाळू चोरी करणे, वाळू चोरी करण्यासाठी अडथळा आणणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, दरोडे टाकणे, चोरी करणे व शासकीय कामात अडथळा आणून टोळीची दहशत निर्माण केली. 

बारामतीतील कोऱ्हाळे येथील ज्येष्टाचा कोरोनाने मृत्यू

या दोन्ही टोळीवर इंदापूर व वालचंदनगर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, १२ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार बबलू पवार याच्या टोळीतील ६ जणांना ३ महिन्यासाठी व महेश अर्जुन याच्या टोळीतील ६ जणांना ६ महिन्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातून व सोलापूर जिल्ह्यातील माढा व पंढरपूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले.

दिलासादायक, जुन्नर तालुक्यातील ही पाच गावे झाली कोरोनामुक्त

बबलू पवार याच्या टोळीतील तडीपार केलेले- बबलु उर्फ सौरभ मनोहर पवार (वय 32), प्रितम सुरेश जाधव (वय 32), सचिन अर्जुन गोसावी (वय 31), बापू उर्फ अनिकेत शिवाजी रणमोडे (वय 28), संदिप रामभाऊ गोसावी (वय 28), युनुसरहिम नसीद पठाण (वय 32, सर्व रा. रणगाव). 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महेश अर्जुन याच्या टोळीत तडीपार केलेले- महेश महादेव अर्जुन (वय 29, रा. चिखली), कुलदिप पोपट रकटे (वय 27,  रा. रणगाव), पिंटु उर्फ दीपक औंदुबर उबाळे (वय 38, रा. वालचंदनगर), तेजस शिवाजी जाधव (वय 24, रा. कळंब), निखील हरी भोसले (वय 28, रा. लासुर्णे), सचिन शिवाजी अर्जुन (वय 37, रा. चिखली) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against two gangs of sand mafia in Indapur taluka