उरुळी कांचन आदलिंगे टोळीवर ''मोक्का''अंतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
आदलिंगे टोळीवर ''मोक्का''अंतर्गत कारवाई

उरुळी कांचन : आदलिंगे टोळीवर ''मोक्का''अंतर्गत कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : उरळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत काही दिवसांपूर्वी वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा खून करणाऱ्या, तसेच लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या आदलिंगे टोळीच्या म्होरक्यासह ७ जणांवर पोलिस आयुक्तांनी मोक्काची कारवाई केली आहे.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

टोळीप्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८ रा. जुनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), स्वागत बापू खैरे (वय २५, रा. उरुळी कांचन) (मयत टोळी सदस्य), पवन ऊर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९, रा. दत्तवाडी भवरापूर रोड, उरुळी कांचन), उमेश सोपान सोनवणे, (वय-३५, रा. राहू, ता. दौंड), अभिजित अर्जुन यादव, (वय-२२ रा. मेडद, ता. बारामती), आकाश ऊर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे, (वय २८, रा. पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), महेश भाऊसाहेब सोनवणे, (वय २८, रा. भांडवाडी वस्ती, राहु, ता. दौड) असे मोक्कांची कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

टोळीप्रमुख महादेव आदलिगे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता आरोपी उमेश सोनवणे याच्या भावाचा सन २०११ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी व अवैद्य वाळू व्यवसाय करण्याचे उद्देशाने काही दिवसांपूर्वी जगताप याचा गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच या टोळीने परिसरात दहशत पसरविण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, पिस्तूल विक्री, बेकायदा जमाव जमवून गुन्हेगारी कृत्य सातत्याने सुरू ठेवली होती. यामुळे या टोळीवर पुणे शहर, पुणे रेल्वे, पुणे ग्रामीण पिंपरी-चिंचवड, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: मुलाकडून पित्याचा खून, मारहाणीमध्ये आई गंभीर

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक, अमित गोरे, पोलिस अंमलदार गणेश सातपुते, संदीप धनवटे, गणेश भापकर, मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने आदलिंगे टोळीवर कारवाई केली. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते करत आहेत.

loading image
go to top