पोलिस फिरत होता विनामास्क...ग्रामस्थांनी लावली फाडायला दंडाची पावती

police
police

निरगुडसर (पुणे) : कोरोनाचे संकट टाळण्यासाठी बिनामास्क असलेल्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे, परंतु आज आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी विनामास्क फोनवर बोलणाऱ्या पोलिसावरच कारवाई करत ५००  रुपयांचा दंड केला.

थोरांदळे येथे पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर कदम हे मास्क न लावता फोनवर बोलत होते. याबाबत ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य नितीन मिंडे यांनी, नागरिक काय पोलिस काय, विनामास्क असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.  त्यानुसार ग्रामसेवक  नवनाथ गायकवाड यांनी  संबंधित पोलिसाला 500 रुपये दंड केला.  त्यानंतर पोलिस व मिंडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्या, थोरांदळे ग्रामपंचायतीने तीन दिवसात १७ जणांवर कारवाई केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

थोरांदळे गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे नितीन मिंडे हे खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यांत निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडर ग्रामपंचायतीमधून आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी घरी येताना वडाच्या झाडाखाली ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी उभे होते. त्यावेळी पोलिस कॉन्स्टेबल  ईश्वर कदम हे  शॉर्ट स्विफ्ट गाडीतून खाली उतरले व मास्क हातात धरून फोन वर बोलू लागले.

हे पाहताच मिंडे यांनी ग्रामसेवक गायकवाड यांना सुचविले की,  कदम यांनी मास्क घातला नाही. त्यामुळे त्यांना दंड कावा, अन्यथा मी जिल्हा परिषदेत कार्यकारी अधिकारी यांना मेलवर कळवतो. त्यांनंतर गायकवाड यांनी पोलिसाला दंडाची पावती केली. मात्र, त्याचा राग अनावर न झाल्याने  पोलिस कॉन्स्टेबल कदम यांनी आरे तुरेची भाषा करत अंगावर धावून जाऊन, गाडीत बस तुला  दाखवतोच , तुझ्यावर 353 दाखल करतो, अशी वक्तव्ये केली, असे मिंडे यांनी सांगितले. 

Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com