Video : सांगा, कलावतांनी कसे जगायचे? कलाकारांनी सुरु केले उपोषण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व कलामंच‌ कलाकारांना स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी यांसह कलाकारांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कलाकारांनी शेवटचा पर्याय म्हणून उपोषण सुरू केले आहे.

पुणे,‌ - लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व कलामंच‌ कलाकारांना स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी यांसह कलाकारांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कलाकारांनी शेवटचा पर्याय म्हणून उपोषण सुरू केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिनेता कुमार पाटोळे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, महाकलमंडळ मधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले आहेत हे आंदोलन बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू आहे. महाकलामंडळ या राज्याची शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, मंदार जोशी,अशोक जाधव यांनी   उपोषणाला बसून पाठिंबा दिला. महा कलामंडळाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी ही प्रमुख मागणी आहे.

पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'          

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कलाकार,तंत्रज्ञ,निर्माता,संस्था यांची शासन दरबारी नोंद करावी, कलाकार म्हणून शासनाची अधिकृत ओळखपत्रे कलाकारांना मिळवित, कलाकारांचा आरोग्य विमा शासनाने काढावा,‌ या प्रमुख मागण्यांसह कलाकारांची वसाहत वसविण्यासाठी शासनाकडून कमीत कमी दरात एखाद्या भूखंडावर, कलाकरांना घरे बांधून देण्यासाठी संस्था आग्रही राहणार आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर

शासनाने कलाकारांना जे मानधन देऊ केले आहे, त्यासाठीची सध्याची वयोमर्यादा 60 वर्षे आहे. ती वयोमर्यादा कमी करावी, प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन मिळावे, शासनाच्या विविध योजनांचा, सवलतींचा लाभ प्रत्येक कलाकाराला मिळेल. कलाकारांच्या निवासाची व्यवस्था प्रत्येक जिल्हा पातळीवर कलाकार भवन सारखी वास्तू उभारणे तसेच शासकीय विश्राम गृहात कोणत्याही परवानगी अथवा पत्राशिवाय कलाकारांना गरज भासल्यास निवासाची सोया व्हावी,अशी या संघटनेची मागणी असून, महाकलामंडळ या शिखरावर संघटनेमध्ये आतापर्यंत 125 संस्था सहभागी झाल्या असून सुमारे आठ लाख कलाकार एकत्र आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor issue by corona virus fasting start