esakal | महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

पायल रोहतगी

महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि गांधी परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मातंग समाजावरील अन्यायाच्या विरोधात निदर्शने

राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो पायल हिने सोशल मिडियावर प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबतचा व्हिडीओ तिवारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्हॉट्सऍपवर पाठवला होता. त्यानंतर याबाबत दखल घेत संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

हेही वाचा: मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पायल रोहतगी नेहमीच वादग्रस्त पोस्ट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. पायल हिने दिग्दर्शक दिबाकर बनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यापूर्वी ट्विटरने खोट्या व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने पायल हिचे अकाऊंट अनेक वेळा बंद केले आहे. हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरणात सांप्रदायिक ट्विट केल्याने तिच्यावर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलने रोहतगी ला २०१९ मध्ये ब्लॉक देखील केले होते. जून २०१९ मध्ये पायल रोहतगी हिने शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार करुन तिच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित केला होता.

हेही वाचा: कामशेत-चिखलसे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी

पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे वैध अपत्य नाही, असा व्हिडिओ तिने ऑक्टोंबर २०१९ मध्ये फेसबुकवर टाकला होता. त्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर तिने प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांची जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर पुन्हा १५ डिसेंबर रोजी तिने नेहरु गांधी परिवारावर टिप्पणी केली होती. यावरुन अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली होती. न्यायालयाने तिला दुसर्‍या दिवशी जामिनावर सोडले होते. त्यानंतर जुलै २०२०मध्ये ट्विटरने तिचे अकाऊंट पुन्हा एकदा निलंबित केले होते. त्यानंतर आता पायल रोहतगी विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्याने काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

loading image
go to top