पुण्यात कोरोना रोखण्यासाठी प्रशासनापुढे तीन पर्याय खुले; काय आहेत वाचा ते सविस्तर

कसबा पेठ - संक्रमित क्षेत्रात असणारा पेठांचा भाग पुन्हा एकदा पत्रे लावून ‘सील’ बंद करण्यात आला आहे.
कसबा पेठ - संक्रमित क्षेत्रात असणारा पेठांचा भाग पुन्हा एकदा पत्रे लावून ‘सील’ बंद करण्यात आला आहे.
Updated on

पुणे - शहरातील सर्वांत दाट लोकसंख्येचा भाग असलेल्या भवानी पेठेत कोरोना विषाणूंचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासनापुढे तीन पर्याय खुले आहेत. त्यापैकी कशावर प्रशासन अधिक भर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शहरातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या भवानी पेठेत 24 टक्के रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल 18 टक्के ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरातील संख्या आहे. ढोले पाटील, भवानी पेठ, येरवडा आणि घोले रस्ता येथे 67 टक्के रुग्ण आढळले आहेत.

शहरातील कोरोना प्रादूर्भावाचे प्रमाण कमी असलेल्या दहा क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात 33 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे चार क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरात समूह संसर्ग झाला. त्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथे संसर्गाचे रुग्ण आढळलेले नसते, असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदविले. देशात तसेच राज्यात समूह संसर्ग झाला नाही. मात्र, पुणे आणि मुंबईमधील विषाणूंचा उद्रेक झालेल्या काही भागांमध्ये हा समूह संसर्ग स्पष्ट दिसून येतो, असेही स्पष्ट केले. त्यामुळे हे भाग हॉटस्पॉट ठरले आहेत.

सूचना गांभीर्यांने पाळा 
रुग्णांची संख्या वाढणाऱ्या परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नाही. तो टाळायचा असल्यास राज्य सरकारकडून ज्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन नागरिकांनी गांभिर्यांने केले पाहिजे.

काय करा

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • मास्क आवश्‍यक वापरा
  • फक्त जेवणाच्या वेळेस नाही, दर दिवसातून वारंवार  साबणाने स्वच्छ हात धुवा 
  • फिजिकल डिस्टिसिंग पाळण्यावर भर द्या.

वाढीची कारणे

  • दाटवस्ती
  • अरुंद रस्ते
  • सार्वजनिक शौचालय
  • छोट्या घरात मोठे कुटुंब
  • फिजिकल डिस्टंसिंगचा अभाव

संसर्ग रोखण्याचे पर्याय
तात्पुरते स्थलांतर -
 दाट लोकख्येतील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करणे, हा एक पर्याय आहे. मात्र, तेथील लोकसंख्येचा विचार करता कितपत शक्‍य आहे, याची चाचपणी सुरू.

जोखमीच्या रुग्णांचे स्थलांतर - हॉटस्पॉट असेलल्या भागातील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, मधुमेहासह अन्य विकारांच्या रुग्णांचे प्राधान्याने स्थलांतर करणे. उर्वरित तरुण आणि जोखीम नसलेल्या नागरिकांना फिजिकल डिस्टंन्सिंग पाळणे सोपे होईल. ही पद्धत जपानमध्ये अवलंबली होती.

प्रत्येकाची आरोग्य तपासणी - हॉटस्पॉटमधील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करणे. त्यामध्ये संसर्गाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचाराखाली आणणे. लक्षणे न दिसणाऱ्या नागरिकांवर देखरेख करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com