esakal | आंबेगाव : पारगावात वाळूमाफीयांना प्रशासनाचा दणका
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव : पारगावात वाळूमाफीयांना प्रशासनाचा दणका

आंबेगाव : पारगावात वाळूमाफीयांना प्रशासनाचा दणका

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : पारगाव (ता. आंबेगाव) येथील मीनानदी पात्रात खेड उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल लंबाते यांनी छापा टाकला असता जेसीबी मशीन तसेच या ठिकाणी उत्खनन केलेली दहा ब्रास वाळूसाठा मिळून आला या कारवाई दरम्यान जेसीबी किंमत पाच लाख 25 हजार रुपये व 40 हजार रुपये किंमतीची 10 ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ

तलाठी संतोष महादू जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल लंबाते, पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, सुर्दशन माताडे, सोमनाथ वाफगावकर यांनी शिंगवे फाट्यावरील सूर्य हॉटेलचे पाठीमागे मीना नदीपात्रात छापा टाकला असता बेकायदा विनापरवाना वेळोवेळी अंदाजे 175 ब्रास वाळू अंदाजे किंमत सात लाख 40 हजार रुपये सदर ठिकाणावरून जेसीबीच्या साहय्याने उत्खनन करून ती ट्रॅक्टरने वाहतूक करून चोरी केल्याची आढळून आले त्याठिकाणी छाप्याच्या वेळी जेसीबी मशीन किंमत रुपये पाच लाख 25 हजार रुपये सदर ठिकाणावरून वाळू गौण खनिज उत्खनन करून चोरी करत असताना तसेच या ठिकाणी दहा ब्रास वाळू साठा किंमत रुपये चाळीस हजार रुपये छापा कारवाई दरम्यान मिळून आला.

हेही वाचा: पुणे, पिंपरी परिसरातील ड्रायव्हिंग स्कूलही सुरू

या ठिकाणावरून ट्रॅक्टर्स पळून गेले असून कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना तसेच कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता पर्यावरणास हानी पोहोचेल असे शासनाची शासकीय मालमत्तेचे चोरी करून घेऊन माननीय जिल्हाधिकारी पुणे जिल्हा यांची कोरोनो अनुषंगाने प्रादुर्भाव रोखणे करिता संचार बंदी आदेश लागू केली असताना सदर ठिकाणी सदर आदेशाचे उल्लंघन करून करून विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होईल अशी कृती केली प्रकरणी विनोद नीलाप्पा राठोड, गणेश सुभाष चांगण, महेश पोपट लोढे, अतुल महादेव ढोबळे राहणार (पारगाव ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: SET अर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मुदत वाढ