अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू!

तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले प्रवेशाचे वेळापत्रक
admission 2022-2023 started for the second year Diploma in Engineering and Technology
admission 2022-2023 started for the second year Diploma in Engineering and Technology Sakal

पुणे : बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यत अर्ज छाननीची पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता याद्या १५ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पूर्णवेळ थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया जाहीर झाली आहे.

या प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे याचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतीरिक्त ई-स्क्रुटनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशिलामध्ये स्वत:चा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि दिलेल्या शुल्क भरून अर्ज पूर्ण करावेत. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये दर्शविलेल्या गुणांची पडताळणी करावी आणि दर्शविलेल्या गुणांमध्ये काही तफावत असल्यास आवश्यक दुरुस्तीबद्दल प्रत्यक्ष किंवा ई-स्क्रुटनीद्वारे तक्रार नोंदवावी. गुणांच्या तफावतीबाबत नोंदविलेली तक्रार योग्य आढळल्यास गुणांमध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाकडून बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित बोर्डाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्रता तपशील भरावेत आणि अर्ज पूर्ण करावा,असे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहिती आणि माहिती पुस्तिकेसाठी संकेतस्थळ :https://dsd22.dte.maharashtra.gov.in

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

तपशील : कालावधी

संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चित करणे : ८ जुलैपर्यंत

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ११ जुलै

  • तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे : १२ ते १४ जुलै

  • अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : १५ जुलै

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीसाठी सुविधा केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध

  • सुविधा केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतील

  • तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

  • चौकशी आणि आयटी सुविधेसाठी जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com