पुणे विद्यापीठात ‘गिर्यारोहण पदविका’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

देशात सर्वाधिक प्रशिक्षित आणि कुशल गिर्यारोहक पुणे शहरात आहेत. गिर्यारोहकांना तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे.
Pune University
Pune UniversitySakal

पुणे - राज्यात गिर्यारोहण (Mountaineering) आणि साहसी खेळांमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु या विषयातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण (Training) मिळण्याची व्यवस्था आतापर्यंत कोणत्याही विद्यापीठात (Pune University) उपलब्ध नव्हती. आता गिर्यारोहण क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण योगदानासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने ‘गिर्यारोहण आणि संलग्न साहसी क्रीडा प्रकार’ हा नवा पदविका अभ्यासक्रम (Course) सुरू झाला असून त्याची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. (Admission Process for Mountaineering Diploma Course Started at Pune University)

देशात सर्वाधिक प्रशिक्षित आणि कुशल गिर्यारोहक पुणे शहरात आहेत. गिर्यारोहकांना तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमात पदविका प्रमाणपत्राबरोबरच नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग, उत्तरकाशी येथे २३ दिवसांचा बेसिक माऊंटेनियरिंग कोर्स देखील करता येणार असून त्याचे वेगळे प्रमाणपत्र मिळणार आहे. गिर्यारोहण आणि साहसी खेळ क्षेत्रात करियरसाठी उपयुक्त असणारा हा कोर्स गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

Pune University
साडी नेसून पुश-अप; पुण्यातल्या महिला डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल

अभ्यासक्रमाची माहिती

- कालावधी : १ वर्ष

- एकूण सत्र (सेमिस्टर): २

- एकूण गुण : १२००

- एकूण क्रेडिट्स : ३६

- शिकवण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन

- शैक्षणिक तास (थेअरी) : सोमवार ते शुक्रवार सायंकाळी

- शैक्षणिक तास (प्रात्यक्षिक) : शनिवार, रविवार (महिन्यातील कोणतेही दोन दिवस)

- प्रवेश पात्रता : १८ ते ६० (दोन्ही समाविष्ट) वयातील कोणीही स्त्री-पुरुष, किमान बारावी पर्यंतचे शिक्षण आवश्यक

- शारीरिक क्षमता : वैद्यकीयदृष्ट्या सक्षम

Pune University
कोरोना संसर्गापासून बालकांना वाचविण्यासाठी गोवरच्या लसीचा फायदा

प्रवेश प्रक्रिया

- अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा असेल

- प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून जुलैच्या अखेरीस होईल

- परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाच्या ‘http://unipunedpe.in/’ संकेतस्थळावर उपलब्ध

- प्रवेश प्रक्रिया ४ जुलैपर्यंत सुरू राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com