सैन्यदलातील टीईएस अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू

भारतीय सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’ (टीईएस) अंतर्गत अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
Military
Military sakal

पुणे : भारतीय सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’ (टीईएस) अंतर्गत अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पुरुष व महिला या दोन्ही उमेदवारांसाठी असून मंगळवारपासून (ता. ८) यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अंतर्गत पुरुषांना ५९ व्या तुकडी आणि महिला उमेदवारांना ३० व्या तुकडीसाठी प्रवेश मिळणार आहे.

या प्रक्रियेमध्ये विविधशाखेतून अभियांत्रिकीची पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सर्व सेमिस्टर/वर्षांच्या गुणपत्रिकांसह निश्‍चित केलेल्या वेळेत सादर करणे आवश्‍यक आहे.

प्रवेश प्रक्रिया एकूण १९१ जागांसाठी असून यातील १७५ जागा पुरुषांसाठी, १४ जाग महिलांसाठी तर, २ जागा या लष्करातील हुतात्म्यांच्या पत्नींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच यामध्ये २० ते २७ आणि जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

यासाठी उमेदवारांना कोणती ही लेखी परीक्षा न देता थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींच्या (एसएसबी) माध्यमातून निवडण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी येथे पुढील प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे उमेदवार सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होतील. या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती व अर्ज करण्‍यासाठी इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. उमेदवारांना येत्या ६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com