येरवडा कारागृहातून पळालेला कैदी १० वर्षानंतर पोलिसांना सापडला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

अनेक महिने त्याचा शोध घेऊनही तो पोलिसांना गुंगारा देत होता. येरवडा पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आली आहे.

पुणे : खुनाच्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची  शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने येरवडा कारागृहातील कोठडीचे गज कापून पलायन केले होते. तब्बल दहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या कैद्यास अखेर येरवडा पोलिसांनी नगर येथे सापळा रचून अटक केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाळासाहेब बजाबा पवार (वय ४९, रा.मंगलापूर, संगमनेर, नगर)असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तत्कालीन तुरूंग अधिकारी दत्तात्रय खांडेकर (वय ४०) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरुन पवार विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

- महत्त्वाची बातमी : ‘आरबीआय’ने बदलला आर्थिक वर्षाचा कालावधी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार यास एका खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याची येरवडा मध्यवर्ती  कारागृहात रवानगी करन्यात आली होती. दरम्यान, पवारने १६ जून २००९ रोजी पहारेकऱ्याची नजर चुकवून कोठडीचे गज कापून पलायन केले होते. अनेक महिने त्याचा शोध घेऊनही तो पोलिसांना गुंगारा देत होता. येरवडा पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आली आहे.

- Coronavirus : 'कोरोना झाला तर...'; कंपनीमध्ये घुसून अधिकाऱ्यांना दिली धमकी!

त्यानुसार पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी पंकज मुसळे, गणेश पाटोळे, समीर भोरडे यांचे पथक पसार आरोपींचा शोध घेत होत. दरम्यान येरवडा कारागृहातून दहा वर्षापूर्वी पळालेला बाळासाहेब पवार हा नगर येथे राहत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने त्यास नगर येथे सापळा रचून त्याला अटक केली. 

- तुम्ही कोरोना तर घेऊन आला नाही ना? सगळ्यांची स्क्रिनिंग होणार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 10 years Prisoner arrested who escaped from Yerwada jail