esakal | महत्त्वाची बातमी : ‘आरबीआय’ने बदलला आर्थिक वर्षाचा कालावधी!
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

आतापर्यंत आरबीआय आणि सरकार टी+१ पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष दोन वर्षांत विभागले जातात.

महत्त्वाची बातमी : ‘आरबीआय’ने बदलला आर्थिक वर्षाचा कालावधी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.२३) नवी दिल्ली येथे आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ ची सुरुवात आता १ एप्रिल रोजी होणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० आता चालू वर्षात ३० जून, २०२० रोजी संपुष्टात येणार आहे, तर आर्थिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात १ जुलै रोजी सुरू होईल, मात्र ३१ मार्च २०२१ रोजी ते संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासूनच होणार आहे. 

- केंद्र सरकारची मोठी घोषणा; देशातंर्गत विमानसेवा करणार बंद!

आतापर्यंत आरबीआय आणि सरकार टी+१ पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष दोन वर्षांत विभागले जातात. सरकारचे आर्थिक वर्ष १ एप्रिल रोजी म्हणजे ‘टी’ला (पाहिले वर्ष) सुरू होते, तर मार्च ३१ ला टी+१ ला (दुसरे वर्ष) संपते. तर आरबीआयसाठी ते १ जुलैला सुरू होते आणि दुसऱ्या वर्षात ३० जून रोजी संपते.

- Coronavirus : 'माँ तुझे सलाम'; इटलीतील भारतीयांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी 'मर्दानी पायलट'!

- लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी 

loading image