Coronavirus : 'कोरोना झाला तर...'; कंपनीमध्ये घुसून अधिकाऱ्यांना दिली धमकी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

"कोरोनाची बाधा झाल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील काय?"असे सांगून कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कंपनीचे काम बंद केले.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून संबंधित कंपनी बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी दिली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनामध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी संजय रामेश्वर इंगळे (वय 39, रा. कलाशंकर नगर, घोरपडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन विजय गायकवाड व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (ता.१९) सायंकाळी सात वाजता विमाननगर येथील टेक महिंद्रा कंपनीत घडला.

- तुम्ही कोरोना तर घेऊन आला नाही ना? सगळ्यांची स्क्रिनिंग होणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगळे हे संबंधित कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. गुरुवारी सायंकाळी आरोपींनी  सुरक्षारक्षकांना धमकावून कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यानंतर कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन "कंपनी बंद करा, नाहीतर कंपनीतील बॉसला उचलून नेतो" अशी धमकी दिली.

- दहावी विद्यार्थ्यांचा 'टक्का' वाढणार ; परीक्षा पुढे ढकलल्याचा परिणाम

तसेच "उद्यापासून कंपनीच्या गेटवर माझे लोक बसतील, कोणालाही बाहेर जाऊ दिले जाणार नाही," अशी धमकी दिली. "कंपनीतील अधिकाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य नाही," असे म्हणून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित करून कंपनीची बदनामी केली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- आता घरपोच मिळणार भाजीपाला, किराणा आणि दूध; प्रशासनानेच घेतला पुढाकार!

दरम्यान, दुसऱ्या घटना आय.बी.टी. सोल्यूशन या कंपनीमध्ये घडली. याप्रकरणी राहुल मोहन शिंदे (वय 27, रा. टिंगरे नगर ) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एक महिला व तीन अनोळखी व्यक्तींच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आय.बी.टी.सोल्युशन या कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

- कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी दुपारी एक ते दीड वाजता एक महिला व तीन अनोळखी व्यक्तींनी कंपनीत बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून "कोरोनाची बाधा झाल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील काय?"असे सांगून कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कंपनीचे काम बंद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against 5 persons who Threatened IT officers to enter in company