esakal | महत्त्वाची बातमी : पुण्यातील कॉलेजांचे गेट सोमवारी उघडणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Colleges

पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय राज्य शासनाला विचारात न घेता केल्याने वादात सापडला.

महत्त्वाची बातमी : पुण्यातील कॉलेजांचे गेट सोमवारी उघडणार!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : तब्बल ११ महिन्यानंतर सोमवारपासून (ता.१५) राज्यातील महाविद्यालयांचे टाळे उघडणार आहे. महाविद्यालयात थेट प्रॅक्टिकल आणि वर्ग सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी तयारी केली आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहांबाबत काहीच निर्णय न घेतल्याने थेट वर्ग सुरू करण्याबाबत विभागप्रमुखांमध्ये संभ्रम असल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर केल्याने महाविद्यालये, शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२१-२१ चे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. नेटवर्क, अपुरी साधने नसल्याने अडथळे येत असल्याने व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल होत नसल्याने महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी केली जात होती.

आणखी वाचा - 'जीर्ण न्याय व्यवस्थेत न्याय मिळत नाही'; गोगोईंचं धक्कादायक वक्तव्य

पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण हा निर्णय राज्य शासनाला विचारात न घेता केल्याने वादात सापडला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होतील अशी घोषणा केली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. पण पुणे विद्यापीठातील विभागांचे अद्याप नियोजन झालेले नाही.

‘सकाळ’ने काही विभागप्रमुखांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘सोमवारपासून विद्यापीठातील विभाग सुरू होणे अपेक्षीत आहे. बहुतांश विद्यार्थी हे पुण्याबाहेरचे आहेत पण वसतिगृहाचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. ते विद्यार्थी आले नाहीत तर त्यांचे आॅनलाइन वर्ग घेऊ आणि पुण्यात राहणारे विद्यार्थी आले तर त्यांना वर्गात शिकवले जाईल, प्रॅक्टिकल घेतले जातील.’’ असेही सांगितले. दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

पुण्यातील पोलिसाची मुंबईत आत्महत्या; स्वत:वर झाडली गोळी​

गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, ‘‘पदव्युत्तर पदवीचे दोन्ही वर्षाचे वर्ग ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरू केले जातील. त्यांचे प्रॅक्टिकलही घेतले जाणार आहेत. पुढील टप्प्यात इतर वर्ग सुरू केले जातील. महाविद्यालयात सॅनिटाझरसह इतर सर्व सुविधा केल्या आहेत. तसेच सर्व परवानग्याही घेण्यात आलेल्या आहेत.’’

ओतूर येथील शरदचंद्र पवार औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा म्हणाले, ‘‘आमच्या महाविद्यालयात २४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ५० टक्के विद्यार्थी एक दिवसाआड बोलविले जातील. बहुतांश विद्यार्थी जवळपासच्या गावांमधील आहेत, त्यामुळे महाविद्यालय सुरू करणे शक्य आहे.’’

आणखी वाचा - 'पडेल ते काम करणार, पण पोरीला शिकवणार'

विद्यापीठाची तयारी अपूर्ण का?

पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून थेट वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, याचा अर्थ विद्यापीठाने सर्व तयारी केली होती. पण वर्ग सुरू करण्यासाठी आणखी एका महिन्याचा कालावधी मिळालेला असताना विद्यापीठाने वसतीगृह आणि थेट शिक्षण घेणे याबाबत पूर्ण तयारी का केली नाही? ही तयारी केली असती तर १५ फेब्रुवारीपासून काय करायचे याचा संभ्रम राहिला नसता, असे नाव न छापण्याच्या अटीवर विभागप्रमुखांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image