esakal | वाचाल तर वाचाल; लॉकडाउननंतर पुस्तक विक्री येतेय पूर्वपदावर!
sakal

बोलून बातमी शोधा

Book_Store

लॉकडाऊन काळात छापील पुस्तक विक्री‌ नव्हती, तरी ई-बुकची मागणी मात्र वाढली होती. ही वाढ तिप्पट असल्याचे ते सांगतात. आता‌ छापील पुस्तकांची विक्री सुरू झाली.

वाचाल तर वाचाल; लॉकडाउननंतर पुस्तक विक्री येतेय पूर्वपदावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'वाचाल, तर वाचाल,' अशी शब्दावली रुढ आहे, पण लॉकडाऊन काळात पुस्तक विक्रीला फटका बसला. त्यावर ई-बुकचा‌ पर्याय वाचकांनी वापरला. मात्र पुस्तक हाती घेऊन वाचनाची मजा‌ वेगळी. आता ही मजा घेता येणार असून, पुस्तकांची प्रत्यक्ष दुकानातील विक्री मंदगतीने का होईना पूर्वपदावर येऊ लागली आहे.

Ganeshotsav 2020 : पुण्यातील गणेश मंडळांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मनोरंजन असो की वाचन या प्राधान्यक्रमाच्या यादीत यांचा‌ क्रमांक जरासा खाली असतो. त्यामुळे लॉकडाऊन काळात साहित्यिक‌ आनंद देणाऱ्या पुस्तकांची‌ विक्री थंडावली होती. 'अनलॉक'चे टप्पे जसे पुढे सरकत आहेत, तशी पुस्तकांची विक्री देखील सुरू झाली आहे, पण कोरोना काळात वाचकांच्या हाती छापील पुस्तक नसले,‌ तरी ई-बुकमधून त्यांनी वाचनाचा आनंद मिळविलाच. या‌ ई-पुस्तकांचा‌ ट्रेंडही आता वाढू लागलेला आहे.

प्रकाशक सुनील मेहता यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन काळात छापील पुस्तक विक्री‌ नव्हती, तरी ई-बुकची मागणी मात्र वाढली होती. ही वाढ तिप्पट असल्याचे ते सांगतात. आता‌ छापील पुस्तकांची विक्री सुरू झाली. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून लोक पुस्तके विकत घेत आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्यात आलेला नाही, तसेच पुण्यातून अनेक नागरिक बाहेरगावी गेले आहेत. ही स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुस्तक विक्रीचा वेगही पूर्वीसारखाच वाढेल, अशी आशा मेहता व्यक्त करतात.

नितीन गडकरींनी नवउद्योजकांना दिला कानमंत्र; 'आत्मनिर्भर भारत' घडविण्यासाठी सांगितली त्रिसूत्री​

रोहन चंपानेरकर म्हणतात, "लॉकडाऊनमुळे ई-बुकची मागणी निश्चितच वाढली आहे. याशिवाय अनेक प्रकाशकांनी सवलती दिल्याने वाचकांनी छापील पुस्तकांची मागणी आधीच ऑनलाइन पद्धतीने नोंदवून ठेवली होती. आता लॉकडाऊनची बंधने शिथिल होतील, तशी ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचतील. वाचकांपुढे ई-बुक हा पर्याय आहे. त्याचा ट्रेंड वाढतो आहे, पण त्यापेक्षा ते छापील पुस्तकालाच‌ प्राधान्य देतात. कारण पुस्तक हाती घेऊन वाचण्याचा आनंद वेगळा असतो."

लॉकडाऊन काळात‌ पुस्तक विक्री बंद असली, तर ई-बुकच्या माध्यमातून वाचकांनी वाचनाचा आनंद मिळविलाच. या काळात वैविध्यपूर्ण वाचन त्यांना करता आले. यामुळे वाचकांची‌ वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनातील रुची‌ अधिक वाढेल. या पाच महिन्यात विशेषत: प्रवास वर्णने, ऐतिहासिक, चरित्रात्मक आणि कथा-कादंबऱ्या वाचल्या गेल्या. बालसाहित्याला देखील खूप चांगला प्रतिसाद होता, असे प्रकाशक सांगतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)